Thodasa Vegala
Click Image for Gallery
मानवी जीवन
वेगळेपणानं भरलं आहे.
काही माणसं, काही
प्रसंग,
काही क्षण, काही
हसू,
काही अश्रू, काही
शब्द,
काही अनुभव
खरोखरच वेगळे
असतात.
आपल्या वेगळेपणातून
ते बरंच
काही सांगून जातात.
ठरलेल्या वाटा
क्षणभर बाजूला ठेवून
वेगळ्या वाटेचा
विचार केला, की
ही वेगळीच
सृष्टी
आपल्यासमोर उभी
राहते.
वेगळा आनंद
ती देते.
काही वेळेला
ती चक्रावूनही टाकते.
आगळंवेगळं असतं
ते
मनाला भावतंही
आणि
आठवणींच्या कप्प्यात
दीर्घकाळ
घर करूनही
राहतं.
प्रत्येकाच्या जीवनात
हे वेगळेपण येतं;
पण माणूस
ते दुर्लक्षित करतो,
प्रसंगी या
वेगळेपणाला चकवा देतो.
काही वेळेला
अजाणतेपणी
हे ‘थोडंसं वेगळं’ विसरून
जातो.
जेव्हा या
वेगळेपणाला
शब्दात पकडण्याचा
प्रयत्न होतो,
तेव्हा शब्द-शब्द
एकत्र येतात आणि
एक पुस्तकच
आपल्यासमोर आणतात.
थोडंसं वेगळं...