Smaran
वाचन, अभ्यास. त्यातून होत गेलेलं लेखन.
ते करण्यासाठी केली गेलेली फिरस्ती.
फिरस्तीतून घडलेला लोकसंग्रह आणि या लोकसंग्रहातून
मन व्यापून टाकणारं कडू-गोड आठवांचं संचित
माणसाला समृद्धीच्या एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं.
प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या आठवणींच्या नोंदी असणारा
‘स्मरण'
हा लेखसंग्रह वाचताना त्याचा प्रत्यय जागोजागी येतो.
अर्थात हा लेखसंग्रह म्हणजे आठवणींच्या केवळ नोंदी नाहीत.
मनातल्या संचित ज्ञानाचा चिकित्सक तितकाच भावस्पर्शी
कोलाज आहे तो. त्यामुळे वाचकांनाही तो समृद्ध करतो.
कारण त्यातून कडू-गोड अनुभवांबरोबरीनेच
गेल्या साठ वर्षांचा राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक
इतिहासही आपल्यासमोर येतो.
मुख्य म्हणजे व्यक्तिगत जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांमधली सामाजिक परिमाणं शोधून त्याला सार्वजनिक कसं बनवायचं
याचीही एक वेगळी दृष्टी आपल्याला हे लेख देऊन जातात.
त्याच बरोबरीने मोठ्या माणसांचा
त्यांच्या साध्या वागण्यातून
आणि सामान्य माणसांचा त्यांच्या असामान्य वागण्यातून
दिसणाऱ्या उत्तुंगपणाचंही एक वेगळं दर्शन
हा लेखसंग्रह घडवतो. त्यामुळे व्यक्तिगत प्रसंग, अनुभव
आणि मान्यवरांच्या व्यक्तिचित्रणांनी सजलेली ही
‘स्मरण'गाथा प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी आहे.
Smaran | Suresh Dwadashiwar
स्मरण | सुरेश द्वादशीवार