Partya
Click Image for Gallery
आपली पुरुषप्रधान
व्यवस्था भूलभुलैयाचा मार्ग
अवलंबून, तर
कधी स्वप्नांचे
मृगजळ तयार करून, तर कधी
वासनेची शिकार
बनवून अनेकींना
नको असताना ‘गर्भदान’ करते. गर्भाला अंकुर
फुटायला लागला, पाय
फुटायला लागले, की महागंभीर
प्रश्न तयार
होतात. या प्रश्नांचे
डंख असह्य झाले, की काही
जणी गर्भाचा देठ
खुडून टाकतात. काही
जणी गर्भच फेकून देतात, तर
काही जणी
गुपचूप हा
गर्भाचा गोळा विक्रीला काढतात. विक्री
झाल्यानंतरही
जेव्हा काळीज
तडफडायला लागतं, समाजाचा दबाव
वाढायला
लागतो तेव्हा
हात-पाय
हलवणारा गर्भगोळा परत
आणणार्याही काही
कमी नाहीत. ही
गोष्ट काळीज पिळवटून टाकणार्या
एका विलक्षण
मातेची... पोटचा गोळा
विकणारी आणि त्याला परत
आणून
झालेल्या चुकीबद्दल
पश्चात्ताप
करणारी...