Rai Ani Etar Katha
पूर्वी मे महिन्याची सुट्टी लागली की गावी "जायचे वेध लागायचे... आता कुणी सुट्टीत आपल्या किंवा मामाच्या गावी त्या असोशीनं जातं की नाही ठाऊक नाही. मला मात्र लहानपणी गावी जायच्या काही दिवस आधीच गावाकडची स्वप्नं पडायला सुरुवात व्हायची. त्या स्वप्नांत गावच्या घरापासून घरातील माणसांपर्यंत आणि अंगण-आवारातल्या झाडापेडांपासून गावच्या नदीपर्यंत सारं काही असायचं. कारण गावचा हा नजारा आईने तिच्या गोष्टींतून आणि प्रत्यक्षातही माझ्या मनात कायमचा रूजवला होता. मी लिहिलेल्या 'राई'मधल्या गोष्टी म्हणजे तिचीच रुजवण आहे. त्या लिहिण्याच्या निमित्ताने, मी , माझंच बालपणातील भावविश्व पुन्हा एकदा धुंडाळलं आहे... आणि त्यातून जे हाती लागलं, खरंच सांगतो, त्याने मी अधिक समृद्ध झालो आहे!
Rai Ani Etar Katha | Mukund kule
राई आणि इतर कथा | मुकुंद कुळे