Poor Economics : Garibiche Arthakaran
आपल्याकडे काही अब्ज डॉलर्स आहेत आणि आपण ते गरीब लोकांच्या भल्यासाठी खर्चू इच्छित असल्याची कल्पना करा.
आपण ही रक्कम नक्की कशी खर्चू? सरकारांचे अब्जावधी डॉलर्स, हजारो स्वयंसेवी संस्था आणि विनानफा
तत्त्वांवर काम करणार्या संस्था हे सगळे गरीब लोकांचं भलं करण्यासाठी काम करतात.
त्यांचं काम मात्र गरीब लोक आणि एकंदर आपलं जग यांच्याविषयीच्या काल्पनिक संकल्पनांच्या आधारेच
नव्हे तर चुकीच्या गृहितकांवर सुरू असतं.अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डुफ्लो यांनी आपल्या पुरस्कारप्राप्त
‘पॉव्हर्टी ‘अॅक्शन लॅब’च्या माध्यमातून विकासनीतीशी संबंधित असलेल्या अर्थशास्त्रामध्ये
‘रँडमाइझ्ड कंट्रोल ट्रायल्स (आरसीटी)’ ही संकल्पना रुजवली. आरसीटीच्या वापरामुळे आणि उपलब्ध असलेल्या
पुराव्याकडे बारकाईनं लक्ष दिल्यामुळे गरीब लोकांसाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना प्रभावशाली ठरतात याची अचूकच नव्हे तर
आपल्याला धक्का देणारी माहिती मिळू शकते असं त्यांचं प्रतिपादन आहे.
गरिबीच्या खऱ्या कारणांविषयी आणि ती संपवण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी खरंखुरं
भान देणारं पुअर इकॉनॉमिक्स हे अपूर्व म्हणता येईल असं पुस्तक आहे.
वैश्विक दारिद्य्राविषयी कळकळा असलेल्या प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं पुस्तक
- स्टीव्हन डी. लेव्हिट, ‘फ्रीकॉनॉमिक्स’ या पुस्तकाचे सहलेखक
वाचलंच पाहिजे असं पुस्तक - नंदन निलेकणी
गुंतवून टाकणारं आणि महत्त्वाचं - फोर्ब्ज
मी रंगून गेलो आणि मला हे पटलं - रॉबर्ट सॉलो,
नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ.
आस्वादपूर्णरीत्या लिहिलेलं आणि मानवतावाद तसंच खरीखुरी जाण यांनी भरलेलं -
प्रताप भानू मेहता, आऊटलुक इंडिया.
नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ
अभिजित व्ही. बॅनर्जी एस्थर डुफ्लो
पुअर इकॉनॉमिक्स
गरिबीचे अर्थकारण
गरिबीचा फेरविचार आणि ती संपवण्याचा मार्ग
Nobel Prize winner
Abhijit Banarjee , Esther Duflo
Poor Economics
Garibiche Arthakaran
Billions of government dollars, and thousands of charitable organizations and NGOs,
are dedicated to helping the world's poor. But much of their work is based on assumptions
that are untested
generalizations at best, harmful misperceptions at worst.
Abhijit Banerjee and Esther Duflo have pioneered the use of randomized control
trials in development economics. Work-based on these principles, supervised by the Poverty Action Lab,
is being carried out in dozens of countries. Drawing on this and their 15 years of research
from Chile to India, Kenya to Indonesia, they have identified wholly new aspects of
the behavior of poor people, their needs, and the way that aid or financial investment
can affect their lives.
Their work defies certain presumptions: that microfinance is a cure-all,
that
schooling equals learning, that poverty at the level of 99 cents a day is just
a more extreme
a version of the experience any of us have when our income falls
uncomfortably low.
This important book illuminates how the poor live, and offers all of us
an opportunity to think of a world beyond poverty.
लेखक परिचय
कलकत्ता विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठ इथे
अभिजीत
विनायक बॅनर्जी यांचं शिक्षण झालं. सध्या ते मॅसॅच्युसेट्स
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे
फोर्ड फौंडेशन इंटरनॅशनल प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून
कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी
इकॉनॉमिक अॅनॅलिसिस ऑफ डेव्हलपमेंटचे अध्यक्ष, एनबीआरमध्ये संशोधक,
सीईपीआरमध्ये संशोधक, काईल इन्स्टिट्यूटमध्ये इंटरनॅशनल रीसर्च फेलो, अमेरिकन
अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अॅंड सायन्सेसचे फेलो, इकॉनॉमेट्रिक सोसायटीचे फेलो, गगनहाईम
फेलो, आल्फ्रेड
पी स्लोन फेलो अशी पदं भूषवलं आहेत. २००९ सालच्या पहिल्या इन्फोसिस
पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जागतिक
बॅंक आणि भारत सरकार
यांच्यासह अनेक संस्थांशी ते मानद सल्लागार म्हणून जोडलेले
आहेत.
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे अर्थशास्त्र
विभागात एस्थर डफ्लो या गरिबीचं
निर्मूलन आणि विकासाधारित अर्थशास्त्र या विषयांमधल्या
अब्दुल लतिफ जमील प्राध्यापक
म्हणून कार्यरत आहेत. पॅरिसमधली एकोल नॉर्मल सुपरियर आणि
एमआयटी इथे त्यांचं
शिक्षण झालं. पीएचडी पूर्ण झाल्यावर त्यांना एमआयटीमध्ये
अर्थशास्त्राच्या सहाय्यक
प्राध्यापकपदी नेमणूक झाली आणि तेव्हापासून त्या तिथेच
कार्यरत आहेत. अमेरिकन
अॅकेडमी फॉर आर्ट्स अॅंड सायन्स तसंच इकॉनॉमेट्रिक सोसायटी
यांच्या त्या फेलो आहेत.
२०१० साली ४० वर्षांच्या खालच्या सर्वोत्तम अमेरिकी
अर्थतज्ज्ञासाठीचा जॉन बेट्स
पुरस्कार, २००९
सालची मॅकऑर्थर ‘जीनियस’ शिष्यवृत्ती, २०१० साली पहिला काल्व्हो-
आर्मेनगोल आंतरराष्ट्रीय पुरस्कार यांच्यासह अनेक पुरस्कार
त्यांना लाभले आहेत. ‘द
इकॉनॉमिस्ट’ नियतकालिकानं ८ सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांच्या
यादीत त्यांचा समावेश केला होता.
‘फॉरिन पॉलिसी’नं सर्वात प्रभावशाली १०० विचारवंतांच्या
यादीत त्यांचा सातत्यानं
समावेश केला. २०१० साली ‘फॉर्च्यून’ मासिकानं ४० पेक्षा कमी
वयाच्या
उद्योगजगतामधल्या सर्वात प्रभावशाली ४० जणांच्या यादीत
त्यांना समाविष्ट केलं.
२००३ साली बॅनर्जी आणि डफ्लो यांनी ‘अब्दुल लतिफ जमील
पॉव्हर्टी अॅक्शन लॅब (जे-
पॅल)’ची स्थापना केली आणि तेव्हापासून ते तिचं काम पाहतात.
जगातल्या पाच
ठिकाणच्या प्राध्यापकांद्वारे या संस्थेचं काम चालतं.
दारिद्र्यनिर्मूलनासाठी रॅंडमाईझ्ड कंट्रोल
ट्रायल्सचा वापर ते करतात. वैज्ञानिक कसोट्यांवर खर्या
ठरणार्या पुराव्यांच्या आधारे
धोरणं आखून गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करणं हे जे-पॅलचं
उद्दिष्ट आहे. २००९ साली जे-
पॅलला विकास आणि सहकार्य
गटातला बीबीव्हीए ‘फ्रंटियर ऑफ नॉलेज’ पुरस्कार मिळाला.