द्विटर' हे नाव अलीकडे अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं आहे. आपले 'अपडेट्स' सगळ्या जगापर्यंत पोहोचवण्यापासून जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींविषयी जाणून घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी द्विटरचा उपयोग केला जातो. जगभरात जवळपास २५ कोटी लोक द्विटरचा वापर करतात. बहुतेक सगळे नेते, अभिनेते आणि प्रसिद्ध लोक आपल्या समर्थकांशी तसंच चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी द्विटरचाच वापर करतात. जेमतेम आठेक वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कंपनीचा प्रवास आपल्याला थक्क करून सोडेल असा आहे. अत्यंत नाट्यमय कलाटण्या आणि 'कॉर्पोरेट' जगामधल्या चक्रावून सोडणाऱ्या उलथापालथी त्यात आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात ट्विटरच्या संस्थापकांनी रचलेल्या चालीही त्यात आहेत. कुठल्याही वाचकाला 'सिलिकॉन व्हॅली' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेमधल्या आयटी क्षेत्राच्या पंढरीमध्ये गाजणाऱ्या कंपन्यांमध्ये किती विलक्षण पद्धतीनं कारभार चालतो, याची विस्मयकारक कहाणी या पुस्तकात मिळेल.
Twitter : Atul Kahate
ट्विटर : अतुल कहाते
Your shopping cart is empty!