The Scam (Harshad Mehtapasun Ketan Parekhparayantchya Arthik Ghotalyanchi Polkhol )
भारतामधल्या
उद्योगक्षेत्रातल्या सत्यघटनेवर आधारित असलेलं हे सगळ्यात चित्तथरारक पुस्तक.
भारतीय शेअर बाजारातल्या सर्वात मोठ्या दोन आर्थिक घोटाळ्यांशी संबंधित असलेल्या
लोकांची आयुष्य आणि त्यांचा या घोटाळ्यांमधला सहभाग यांची वेगवान कहाणी यात सादर
केलेली आहे.
लहानपणी
फारकत झालेल्या दोन जुळ्या भावंडांची पुन्हा भेट व्हावी असे दोन एकसारखे घोटाळे नऊ
वर्षांच्या फरकानं घडले. १९९२ साली हर्षद मेहता होता तर २००१ साली केतन पारेख
दोन्ही वेळा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) झोपा काढत असल्यामुळे अनेक
बँका कोसळल्या.
१९९१-१९९२
आणि १९९९-२००० या दोन्ही काळांमध्ये अत्यंत धोकादायक व्यवहार करून लोक शेअर
बाजारात मोठी कमाई करत होते. 'श्रीमंतांसारखा विचार करा हा हितेन दलालचा
१९९९ सालचा मंत्र होता. १९९२ सालाप्रमाणेच २००१ सालीसुद्धा एक शेअर दलाल न्यू
यॉर्कच्या शेअर बाजारामध्ये व्यवहार करण्यासाठीचं सदस्यत्व मिळवण्याची धडपड करत
होता. या दोन्ही घोटाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार खेळणं, नियंत्रकांनी डोळेझाक करणं, आपला आत्मसन्मान राखण्यासाठी
टोकाला जाणं, प्रचंड नुकसान होणं आणि शेअर बाजार कोलमडून
पडणं अशा अनेक बाबतींमध्ये साम्य दिसून येतं.
यातच
एकूण व्यवस्थेमधल्या दोषांची करुण कहाणीसुद्धा गुंफलेली आहे... मान्यवर समजल्या
जाणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांच्या मदतीनं व्यावसायिक नीतिमत्तेच्या चिंधड्या उडवत
एका सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रवर्तकानं अत्यंत सहजपणे कसा दिवसाढवळ्या दरोडा
घातला... सगळ्या मोठ्या घोटाळेबाजांना मदत करणाऱ्या मान्यवर ग्लोबल ट्रस्ट बँकेचा
धुव्वा कसा उडला... हर्षदला झालेल्या विलक्षण नुकसानामुळे प्रचंड अडचणीत आलेल्या
एका बँकेला RBI
नं अत्यंत तत्परतेनं कसं अडचणीतून बाहेर काढलं...
'द स्कॅम' हे इतरत्र कुठेही वाचायला मिळणार नाही अशा 'थक्क करणाऱ्या' आणि अविश्वसनीय माहितीनं खच्चून
भरलेलं पुस्तक आहे.
The Scam | Debashish basu and Sucheta Dalal