Shibu Ani Rakshas
Click Image for Gallery
चतुरस्त्र प्रतिभेचे कलावंत असलेल्या रे यांनी सिनेमाप्रमाणेच साहित्यक्षेत्रातही अव्वल दर्जाची विपुल निर्मिती केली. त्यांनी मुलांसाठी व किशोरांसाठी लिहिलेल्या कथा या जगातील कुठल्याही उत्तम बालसाहित्याप्रमाणेच प्रौढ वाचकांनादेखील तितक्याच मनोरंजक आणि आनंद देणाऱ्या वाटतात. ओघवती भाषा, सुबोध कथानक व जिवंत पात्ररचना यामुळे त्यांच्या कथा आपल्या मनाची पकड घेतात. आजच्या स्पर्धेच्या युगात भौतिक यश मिळवण्याच्या शर्यतीत ऊर फुटेस्तोवर धावणाऱ्या मुलांच्या नैसर्गिक हळुवार संवेदनांना, त्यांच्या कल्पनाशक्तीला व माणुसकीला बोथट होण्यापासून वाचवायचे असेल तर केवळ अभिजात साहित्य व कला हीच आशास्थाने आहेत. सत्यजित रे यांच्या कथांमध्ये ते सामर्थ्य आहे. त्याची प्रचिती वाचकांना हा कथासंग्रह नक्कीच देईल.