Tumche-Aamche Superhero- Dnyaneshwar Mule
ही गोष्ट आहे
कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ
तालुक्यातल्या
अब्दुललाट नावाच्या एका
छोट्याशा गावातली!
तिथला एक अनवाणी
पायानं धावणारा निरागस
मुलगा अशी भरारी
घेतो, की
आकाशाला गवसणीही कमी
ठरावी. आपल्या कार्यकर्तृत्वानं
देशाचं नाव जगभरात
उज्ज्वल तर करतोच,
पण तरीही
या मातीशी असलेलं
आपलं नातं तो विसरत नाही.
त्याच्यातलं माणूसपण
कधी तसूभर कमी
होत नाही. हा मुलगा प्रतिकूल
परिस्थितीतूनही
आय.ए.एस. होण्याचं स्वप्न
कसं बघतो आणि
ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी
स्पर्धा परीक्षेत कसा
यशस्वी होतो? स्पर्धा
परीक्षेतही विदेश सेवेत
रुजू होताना त्याला
कुठल्या आव्हांनाना तोंड
द्यावं लागतं?
किती आणि कसे
परिश्रम करावे लागतात?
यशाचा मार्ग दाखवणार्या
एका सच्च्या दिलाच्या
विश्वचि माझे
घर आणि माणुसकी
हाच धर्म जाणणार्या
एका कर्तव्यनिष्ठ अधिकार्याला म्हणजेच
तुमच्या-आमच्या सुपरहिरोला
-
पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया- डॉ.
ज्ञानेश्वर मुळे
- यांना भेटायचंय?
चला तर मग!
भेटू या ‘तुमचे-आमचे सुपरहिरो-
डॉ. ज्ञानेश्वर मुळे’ यांना!