Sinh
गुजरातच्या गीर अरण्यात जगातील
शेवटचे उरलेले काही आशियाई सिंह आजही स्वच्छंदपणे विचरण करतात. या सिंहांचा
नामशेष होण्यापासून परतीचा प्रवास तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकरांनी स्वत: गीरच्या अरण्यात
फिरून घेतलेले थरारक अनुभव त्यांनीच काढलेल्या उत्तम फोटोग्राफ्ससोबत यात तुम्हाला
अनुभवायला मिळतील. निसर्गप्रेमी वाचकांसाठी सिंहांपाठी केलेली
ही भटकंती हा नक्कीच आनंददायी अनुभव ठरेल.