Makrand Saathe Nivdak Nibhand - 2
मानवी समाजातील
विविध लोकसमूहांनी वेगवेगळ्या
प्रदेशात आणि वेगवेगळ्या कालखंडात
आपापली सांस्कृतिक निजात्मता
अथवा ओळख सिध्द करताना, एका
बाजूला देवाणघेवाण तर
दुसर्या बाजूला एकमेकांवर आक्रमणे
यांचा आधार घेतला. ही आक्रमणे
म्हणजे केवळ शस्त्रास्त्रांनी चढवलेले
हल्ले नव्हेत. त्यांना आर्थिक, वैचारिक, धार्मिक
अशी अन्य अंगेही होती. या
अखंड धुसळणीत सतत खेचल्या
जाणार्या मानवसमूहांपुढील महत्वाचा
पेच म्हणजे आपली ओळख
कायम ठेवीत होणार्या इष्ट
परिवर्तनाचा स्वीकार व अनिष्ट
परिवर्तनांचा प्रतिकार कसा करायचा.
इतिहासाच्या ओघात
मानवी समाज आज - विशेषतः 1990 नंतर - अशा टप्प्यावर
आलेला आहे की जेथे
हा पेच अत्यंत निकराचा
बनलेला आहे. साहजिकच तो
समाजाविषयी आस्था असणारे समाजशास्त्रज्ञ,
तत्त्वचिंतक, सर्जनशील कलावंत यांच्या
विचारांचा विषय झाला आहे.
या चर्चेत
सहभागी होऊन महत्वाचे योगदान
देणार्या मराठी विचारविश्वातील लेखकांमध्ये
श्री. मकरंद साठे यांचे
नाव आघाडीवर आहे. प्रस्तुत पुस्तक
साठे यांच्या याविषयीच्या निवडक
चिंतनाचा आणि मुलाखतींचा संग्रह
आहे.
एका ललित लेखकाच्या प्रगल्भ
वैचारिकतेचा प्रत्यय या संग्रहातून
घेता येतो. स्वतः लेखकाच्या
विशिष्ट भूमिकेच्या जडणघडणीच्या
प्रक्रियेवरही त्यातून प्रकाश पडतो. ही
भूमिका समजल्यामुळे साठे
यांच्या नाटकांचे व कादंबर्यांचे
आपले आकलनही आपोआपच अधिक
समृध्द होईल.
विवेकनिष्ठ संवादावर आधारित प्रगल्भ व सहिष्णू अशा समाजाच्या रचनेकडील आपल्या प्रवासास या लेखनामुळे निश्चितच मदत होईल.
- सदानंद मोरे
Makrand Saathe Nivdak Nibhand - 2
मकरंद साठे निवडक निबंध -२