Shikshan
शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची
एक प्रेरणादायी कहाणी
‘स्कूल ऑफ एक्सलेन्स’, बोर्डाच्या परीक्षेतील सुधारलेले निकाल, अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या इमारती, अशा प्रत्येक बाबतीत दिल्लीच्या सरकारी शाळांनी स्वत:ची नवी ओळख निर्माण केली आहे. ‘आनंद वर्ग’ आणि ‘नवउद्यमी
मानसिकता अभ्यासक्रम’ यांसारख्या अभिनव आणि दूरदर्शी
प्रकल्पांच्या यशस्वितेमुळे राजधानीतील सरकारी शाळांत दृश्य परिवर्तन झाले आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी वास्तविकतेचे भान
ठेवून दूरदर्शी योजनांचा पाठपुरावा केल्यामुळे हे शक्य झाले आहे. या पुस्तकात मनीष सिसोदिया यांनी शिक्षणमंत्री म्हणून आपले अनुभव, प्रयोग व त्यांची यशोगाथा शब्दबद्ध केली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा ध्यास घेतलेल्यांसाठी
हे पुस्तक एक प्रेरणास्रोत आहे.