To kill A Mockingbird

-20% To kill A Mockingbird

 हार्पर ली या अमेरिकन लेखिकेची मुख्य ओळख एकाच रचनेमुळे जगप्रसिद्ध झालेली

लेखिका अशी आहे. टु किल अ मॉकिंगबर्ड हीच ती अजरामर कलाकृती होय. ली

यांच्या या कादंबरीचा विद्यागौरी खरे यांनी केलेला प्रस्तूत अनुवाद प्रकाशित करून

मनोविकास प्रकाशनाने मराठी साहित्यविश्‍वाच्या समृद्धीत मोलाची भर घातली

आहे.

वसाहतवादावर पोसलेल्या सर्व युरोपियन राष्ट्रांना मागे टाकून अमेरिकेने विसाव्या

शतकात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली यात वाद नाही. परंतु या घोडदौडीत

अफ्रिकन कृष्णवर्णीय गुलामांचे फार मोठ्या प्रमाणावर शोषण झाले ही वस्तुस्थिती

आहे. असे असले तरी, अमेरिकेतीलच एक समूह निग्रोंच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत

राहिला आणि त्याने त्यासाठी गृहयुद्धाचाही धोका पत्करला. ही एक प्रकारची

रुपेरी कडा होय. महात्मा जोतीराव फुले यांनी आपली ‘गुलामगिरी’ ही कृती या

समूहातील न्यायप्रिय योद्ध्यांना अर्पण केली. ...तरीही वंशश्रेष्ठत्त्वाचा हा गंड

अमेरिकन मानसिकतेचा जणू हिस्सा बनला. गेल्या शतकातील साठच्या दशकात हा

प्रश्‍न परत एकदा ऐरणीवर आला होता. मार्टिन ल्यूथर किंगसारखे नेते यातूनच पुढे

आले. याच रणधुमाळीत केनेडी बंधूंची कसोटी लागली.

हार्पर ली यांची ही कादंबरी याच वातावरणात प्रसिद्ध झाली आणि गाजली.

ऑटिकस फिंच या वकिलाच्या कुटुंबाला केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेली ही कादंबरी

ऑटिकसच्या स्काऊट या निरागस पण स्मार्ट मुलीच्या निवेदनातून ती आकाराला

येते. यातील वंशवाद तसा खास अमेरिकन असला, तरी विद्यागौरी खरे यांनी

म्हटल्याप्रमाणे आपला समाज, आपले शेजारी ह्यांचा विचार करायला शिकवणारे हे

पुस्तक एकमेकांपासून तुटत चाललेल्या आत्मकेंद्री आणि स्वार्थी वृत्तीने पछाडलेल्या

आपल्या समाजाकरता फार आवश्यक आहे.

आपल्याच भाऊबंदांनी चालवलेल्या कृष्णवर्णीयांच्या शोषणाविरूद्ध उभ्या

ठाकलेल्या वकिलाची ही कहाणी असली तरी हा वकील एक आदर्श पालक आहे.

आपल्या कृत्यांचे नैतिक परिणाम विशेषत: आपल्या मुलांवर काय होतील याचा

विचार करूनच पुढे पाऊल टाकणारा तो एक जबाबदार व प्रगल्भ नागरिक आहे.

 

कादंबरीतील किशोरवयीन व प्रौढ पात्रांचा समतोल लेखिकेने खूप कौशल्याने

सांभाळला आहे.

अलीकडे मूल्यशिक्षणाची चर्चा नेहमी ऐकू येत असते. या दृष्टीने पाहिले तर ही कृती

मूल्यशिक्षणासाठी एक उत्कृष्ट पाठ्यपुस्तक ठरावी.

- सदानंद मोरे

1961 मध्ये पुलित्झर पुरस्कार प्राप्त कादंबरी आणि त्यानंतर या पुस्तकावर आधारित चित्रपटाला अकॅडमी अवॉर्डने गौरविण्यात आले.

हा चित्रपट पुस्तकाप्रमाणेच देखील अभिजात कलाकृती म्हणून गणला जातो.

 

टु किल अ मॉकिंगबर्ड / To kill A Mockingbird

लेखक -हार्पर ली / Harper Lee

Translated by vidyagauri Khare

 

हार्पर ली
(1926 - 2016)
अमेरिकेतल्या मन्रोव्हिल, अलाबामा येथे 28 एप्रिल 1926 रोजी जन्म आणि 19 फेब्रुवारी 2016 रोजी मृत्यू
हार्पर ली या नावाने त्या लेखन करत.
टु किल अ मॉकिंगबर्ड (1960) आणि गो सेट अ वॉचमन (2015) ही दोन पुस्तकं प्रकाशित
टु किल अ मॉकिंगबर्ड या कादंबरीने त्यांना अमेरिकन इंग्लिश लेखिका म्हणून ओळख मिळवून दिली.
१९३०च्या दशकातील अमेरिकेतील वंशद्वेशाचे दोन छोट्या मुलांच्या दृष्टीने वर्णन करणाऱ्या या कादंबरीचा समावेश जगातिल क्लासिक लिटरेचरमध्ये होतो.
अमेरिकन साहित्यामधील महत्वाचे लेखन म्हणून लींच्या टु किल अ मॉकिंगबर्ड या पुस्तकाला १९६१चे पुलित्झर पारितोषिक मिळाले आह.
हार्पर ली यांना २००७मध्ये प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.

नाव: विद्यागौरी खरे 
जन्म : १९४६
शिक्षण : BA  सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय  १९६६
            MA  सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय  १९६८
            PhD  रष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय १९९१
           विषय : Katherine  Mansfield  यांचे समीक्षा-विचार व त्या संदर्भात त्यांचे साहित्य 
शैक्षणिक कार्य : एसएनडीटी विश्वविद्यालय, पुणे येथे अध्यापन १९६८-६९, १९७४-७८
                       धरमपेठ कॉलेज, नागपूर येथे अध्यापन १९७८-८३
                       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालय इंग्रजी व ललित कला विभागांत अध्यापन २००५ पर्यंत.
चित्रपट-आस्वाद  : नागपुर च्या सिने मोंताज  संस्थेत १०७८ ते आजवर कार्य. एका आस्वाद शिबिराचे आयोजन.
पुस्तक क्लब : 'माग्रस ' या पुस्तक क्लबशी १९७८-२००८ पर्यंत संलग्न.

प्रकाशन : 'आजचा सुधारक' या वैचारिक मासिकाचे प्रकाशक-पद १९९८ ते २०१० 



Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.300.00
  • Rs.240.00