Pratibhsanwad
कुठल्याही कलावंताचं आयुष्य आणि त्याची साधना-चिंतन-मनन हे एकप्रकारे सामाजिक दस्तावेजाचाही भाग असते.
निदान त्यासाठी तरी प्रत्येक सर्जनशील कलावंताशी-लेखकाशी संवाद साधणं अतिशय गरजेचं आहे. एवढंच नाही,
तर ते पुस्तकरूपाने किंवा कुठल्याही माध्यमातून समाजासमोर येणंही तितकंच आवश्यक आहे.
त्यातून सामाजिक-सांस्कृतिक अभिसरणाचीच प्रक्रिया एकप्रकारे उलगडत असते.
‘प्रातिभसंवाद’ची निर्मिती त्यातूनच झालेली आहे. या पुस्तकात संकलित करण्यात आलेल्या प्रसिद्ध दिवंगत संशोधक-साहित्यिक रा. चिं. ढेरे,
लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर, कथा-कादंबरीकार कमल देसाई आणि अनुवादक दाम्पत्य उमा व
विरुपाक्ष कुलकर्णी यांच्या मुलाखती म्हणजे त्यांच्या सर्जनशीलतेचा प्रवास आहे.
या प्रवासातून त्या-त्या लेखकाची ‘लेखकीय विचारसृष्टी’ अवतरत असल्यामुळेच
त्या मुलाखती पुस्तकरूपाने वाचकांसमोर आणत आहोत.
Pratibhsanwad
प्रातिभसंवाद