Suryakoti Samprabh Drashta Anuyatrik Dr. Anil kakodkar
समाजाच्या विविध क्षेत्रात अनेक व्यक्ति कर्तृत्वाची
नवीनवी शिखरे गाठत देशाच्या उभारणीत आपले योगदान देत असतात. अशांपैकी एक असामान्य व्यक्तिमत्व
म्हणजे पद्मविभूषण डॉ. श्री. अनिल काकोडकर. ‘सूर्यकोटि समप्रभ’ ही त्यांची जीवनकहाणी.
अणुशास्त्र हा विषय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने
अतिशय महत्त्वाचा तरीपण सर्वसामान्यांना न समजणारा. पोखरणच्या रणातून त्याची ओळख व
महत्त्व आपल्या सर्वांपर्यंत पोचवताना ते अणुबॉम्ब व अणुशक्ती ह्यामधील आपला संभ्रम
दूर करतात.
विज्ञान आणि समाजाची नाळ जोडण्यासाठी झटताना पुढच्या
पिढीला नवी क्षितिजे आणि प्रेरणा देऊन जाणारे हे व्यक्तिमत्त्व. सामर्थ्यशाली देशाच्या
स्वप्नाच्या जोडीला ह्या पुस्तकात दर्शन घडते ते अणुशास्त्र ह्या विषयाला वाहून घेतलेल्या
पण कुटुंबवत्सल असलेल्या एका यात्रिकाचं.
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच डॉ. अनिल
काकोडकरांची ही जीवनकहाणी.
‘सूर्यकोटि समप्रभ’ या त्यांच्यावरील चरित्र ग्रंथास
माझ्या हार्दिक शुभेच्छा!
- सचिन रमेश तेंडुलकर
Suryakoti Samaprabha
Drashta Anuyatrik &
Aneeta
Patil
Sampadak : Chandrashekar Kulkarni