Tichya Aarogyasathi Sarva Kahi
'स्त्री'पण निभावणं, ही सहज सोपी गोष्ट नाही. मुलगी म्हणून जन्माला आल्यावर 'स्त्री'पणाला सामोरं जाणं म्हणजे स्त्री म्हणून असणाऱ्या सहनशक्तीची परीक्षाच आहे. वयात येणं, लग्न, गर्भधारणा, मुलांचे जन्म, संतती नियमन, मेनोपॉज या चक्रात अडकलेल्या बाईपणावर अनेक जबाबदाऱ्या निसर्गतःच येत राहतात. या सगळ्यांबरोबर गर्भपात, वजनवाढ, मूल न होणं अशा समस्याही आहेतच. आयुष्यातली ३०-४० वर्षं या चक्रात अडकूनही सदृढ शरीर, सदृढ मनाची आस बाळगत जगत राहणं, हे स्त्रियांपुढचं मोठं आव्हान ठरतं.
स्त्रीच्या जगण्यातल्या नाजूक पेचांना समजून घेत आश्वासक संवाद साधत, तिची वाटचाल सहज व्हावी म्हणून हे पुस्तक. प्रत्येक स्त्रीनं वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वाचावं, असं खास पुस्तक.
Tichya Aarogyasathi Sarva Kahi : Dr.Kishor Atnurkar
तिच्या आरोग्यासाठी सर्व काही : डॉ. किशोर अतनूरकर