Savaiche Gulam

-20% Savaiche Gulam

   शरीराला आणि मनाला सवयी का व कशा लागतात त्यामागील शरीरक्रिया आणि मनोव्यापार कोणते नियमित आहार आणि निद्रा, व्यायाम आणि सकाळचा प्रसन्न उत्साह या सवयींतून प्रकृती.. गैरशिस्त, अव्यवस्थितपणा, व्यसनं आणि भयभीतता या सवयमधून विकृती... आणि वक्तशीरपणा, वागण्या-बोलण्यातील आदब आणि सभ्यपणा या सवयींतून संस्कृती व्यक्त होते. आपल्याला वाटचाल करायची आहे विकृतीकडून... संस्कृतीकडे !


वाईट सवयीमधून सुटका हा फक्त एका क्षणाचा प्रश्न असतो. नकळत घडणाऱ्या चुकीच्या कृतीला टाळायचं असल्यास एखादा क्षणही पुरेसा असतो. तो क्षण असतो तल्लख आत्मभान बाळगण्याचा. तो क्षण असतो मोहातून स्वत:ला सोडविण्याचा. तो क्षण असतो एखाद्या दीर्घ श्वासाकरता त्या दीर्घ श्वासानं मनात सुविचाराला जागा मिळते. त्या दीर्घ श्वासानं क्षणकाल डोळे मिटून आपण मनात तटस्थ भाव जागृत करतो. त्या दीर्घ श्वासानं मनातील मोह, भीती, काळजी आणि धास्ती मिटते. त्या दीर्घ श्वासानं मनाला हुरूप येतो. मनातील आत्मविश्वास खडबडून जागा होतो


Savaiche Gulam : Dr.Rajendra Barve

सवयीचे गुलाम  : डॉ. राजेंद्र बर्वे   

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Dr.Rajendra Barve

  • No of Pages: 132
  • Date of Publication: 27/01/2022
  • Edition: 5
  • ISBN: 978-93-82468-44-8
  • Availability: 45
  • Rs.150.00
  • Rs.120.00