Prabodhan Pandharicha Krantikari Sant Gadgebaba

-20% Prabodhan Pandharicha Krantikari Sant Gadgebaba

संत गाडगेबाबा ही केवळ व्यक्ती नाही तर एक विचार आहेहा विचार विवेकवादी आहेबुद्धिप्रामाण्यवादी आहे.  समाजाला धार्मिकआर्थिकमानसिक भ्रमातून मुक्ती देणारा हा विचार आहे.  माणसाला केंद्रबिंदू ठरवत इथल्या पाखंडी व्यवस्थेचे बुरूज  उद्ध्वस्त करण्याची ताकद संत गाडगेबाबांनी कीर्तनामधून समाजमनात पेरली.  त्यांनी कधीही शाळेची पायरी चढली नव्हती.

रस्त्याच्या शाळेत आणि दुनियेच्या विद्यापीठात शिकलेला हा खरा लोकशिक्षक होताया महानायकाने देशभरात  प्रबोधनाचा प्रकाश वाटलाअनेक विद्यापीठांना जे शक्य नाही ते या लोकविद्यापीठाने करून दाखवलेत्यांनी निर्माण केलेल्या प्रकाश पर्वात प्रत्येकाने उजळून निघावे म्हणून शब्दफुले वाहन्याचा हा प्रयत्न आहेप्रबोधनाच्या चळवळीत काम करीत असताना कार्यकर्त्यांची जडणघडण कशी व्हावी यासाठी हे पुस्तक कार्यकर्त्यांना निश्चितच बळ देईल.  ज्ञान वंचितांना ज्ञानाभिमुख करण्याचा संत गाडगेबाबांचा प्रयत्न महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीतील मैलाचा दगड आहेसमाजातील प्रबोधनाचे विझलेले निखारे पुन्हा प्रज्वलित होतील,

हीच भावना या लिखाणामागे आहे.


प्रबोधन  पंढरीचा क्रांतिकारी संत

गाडगेबाबा / prabodhan Pandharicha Krantikari Sant Gadgebaba

लेखक - संतोष अरसोड / Santosh Arsod

 

लेखक परिचय

सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारयवतमाळ जिल्ह्यातील नेर या तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यऔषधनिर्माण शास्त्राची पदविका असूनही औषधी व्यवसायात मन न रमल्याने सामाजिक कार्यात सहभागदैनिक लोकमतमध्ये तालुका प्रतिनिधी ते यवतमाळ कार्यालयात दोन वर्षे उपसंपादक म्हणून कामपत्रकारितेतून शेती व मानवी प्रश्नांना प्राधान्यसामाजिक चळवळ गावखेड्यात पोहोचविण्यासाठी वाणी आणि लेखणीचा प्रभावी वापर करणारा  कार्यकर्ताशिक्षणापासून एखादा हुशार विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून हातभार लावणारा संवेदनशील माणूस म्हणून ओळखसंत गाडगेबाबा यांच्या सामाजिक चळवळीवर अनेक ठिकाणी प्रबोधनपर व्याख्यानेविदर्भातील अनेक वादविवाद स्पर्धांमध्ये सहभागपुस्तकासोबतच माणसं वाचणे ही त्यांची खासियतसध्या ‘मीडिया वॉचया अनियतकालिकात कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Santosh Arsod

  • No of Pages: 192
  • Date of Publication: 29 March 2021
  • Edition: 1
  • ISBN: 978-81-95235-06-3
  • Availability: 98
  • Rs.250.00
  • Rs.200.00