Nelson Mandela
दक्षिण आफ्रिकेत
ऐंशी टक्के लोक कृष्णवर्णीय. केवळ रंगामुळे,
वर्णद्वेषामुळे या
दक्षिण आफ्रिकेतल्या जनतेला
आपल्याच देशात
वर्षानुवर्षं गुलाम
म्हणून वागणूक मिळाली. या
परिस्थितीविरोधात
नेल्सन मंडेलानं
अतिशय संयमानं, धैर्यानं
लढा दिला.
वर्णद्वेषाविरुद्ध सुरू
असलेल्या या लढ्यात मंडेलाच्या
आयुष्यातली
सत्तावीस वर्षं
तुरुंगात गेली. त्याच्या वैयक्तिक
आयुष्यात अनेक चढ-उतार
आले तरीही
मोठ्या जिद्दीनं मंडेलानं
लढा चालूच ठेवला आणि
दक्षिण आफ्रिकेवर
असलेलं गोर्या लोकांचं
अन्यायी वर्चस्व संपुष्टात
आणण्यात महत्त्वाची
भूमिका निभावली. ही
सगळी लढाई
अत्यंत संयमानं
लढताना नेल्सन मंडेलानं माणूसपणाची
शिकवणच
जगासमोर ठेवली
आणि या कामातूनच त्याचं
नाव इतिहासात अजरामर
झालं.
मंडेलाच्या या
जिद्दीला, धैर्याला, सहनशीलतेला
सलाम करणारी
आणि दक्षिण
आफ्रिकेचा अन्यायी इतिहास उलगडून
दाखवणारी
ही प्रेरणादायक
कहाणी!