Adnyat Mumbai – 2
‘मुंबई आता पहिल्यासारखी राहिली नाही’ - आज साठी-सत्तरीत असलेल्या
मुंबईकराच्या तोंडून अशी खंत वारंवार ऐकायला मिळत असते. परंतु मुंबई ही
प्रवाही नगरी आहे. ती सतत बदलत आली आहे. मुंबईकराची प्रत्येक नवी पिढी
त्या बदलांबरोबर कधी आपखुशीने, कधी नाइलाजाने मुंबईला उराशी बाळगून
असते आणि मुंबई त्याला! मुंबई आणि मुंबईकराच्या या प्रेमसंबंधातूनच तर
रोजच्या वावरातल्या मुंबईची कालची एखादी खूण सापडते तेव्हा तो हरखून जातो.
मुंबईकराच्या मनाच्या तळाशी दडलेल्या ह्या कुतूहलाला जागे करण्याचा प्रयत्न
म्हणजेच नितिन साळुंखे यांचे ‘अज्ञात मुंबई’ हे पुस्तक आणि एकदा चाळवलेले
ते कुतूहल पुरवणारे त्यांचे नवे पुस्तक म्हणजे प्रस्तुत ‘अज्ञात मुंबई – २’.
मनोविकास प्रकाशनचा पत्ता पुण्याचा असला तरी प्रकाशक अरविंद पाटकर हे
अगदी गाभ्यातून मुंबईकर आहेत, ह्याचाही हा पुरावाच. हा प्रयत्न जितका
अभ्यासपूर्ण आहे तितकाच लोभस आणि कुतूहल-भूक वाढवणारा आहे.
मुंबईबाहेरच्या माणसाला असलेलं मुंबईविषयीचं आकर्षण लपून राहिलेलं नाही.
त्याचं रूपांतर प्रेमात होतानाही प्रत्ययाला येतच असतं... प्रस्तुत पुस्तकामुळे त्या
प्रेमाला मुंबईच्या जपणुकीचंही अस्तर लावलं पाहिजे अशी भावना झाली तर मुंबई
आणखी ‘बाका नगरी’ ठरेल...
Adnyat Mumbai – 2 | Nitin Salunkhe
अज्ञात मुंबई – 2 | नितीन साळुंखे