Swadishta_Aarogya

-20% Swadishta_Aarogya

आपली आजची धावपळीची जीवनशैली बघता आहाराचा विचार करायला वेळच 

नसतो म्हणून 'आहारमूल्या'चं महत्त्व आपण नजरेआड करतो. अगदी आपल्या 

रोजच्या स्वयंपाकातल्या गहू, तांदूळ, भाज्या, फळे यांचा संयुक्तिक वापर केला 

तरी बरेचसे आजार दूर ठेवणं किंवा थोडक्यात बरे करणं सहज शक्य असतं. 

निरोगी जीवनशैलीसाठी आपल्या प्रकृतीनुसार ऋतूबदलानुसार तसंच वय, लिंग, 

व्यायामशक्तीनुसार आहारात बदल करणं आवश्यक असतं. याविषयी सविस्तर 

माहिती या पुस्तकात लेखिकेनं सांगितली आहे. स्वयंपाकघरातल्या रोजच्या 

वापरातल्या पदार्थांपासून कुठल्याही किचकट पाककृती न सांगता केवळ 

त्यांचा योग्य वापर करून अनेक दुखण्यांपासून, आजारांपासून आराम मिळेल, 

असे उपाय या पुस्तकात दिले आहेत. प्रत्येकाला स्वादिष्ट आरोग्य बहाल करणारं 

हे पुस्तक पहिल्या भागाप्रमाणे प्रत्येक स्वयंपाकघरात असायलाच हवं.


लेखिकेविषयी...

१. शालान्त परीक्षेत मराठी विषयात द्वितीय क्रमांक २. बी.ए.एम.एस.ला नागपूर 

विद्यापीठातून प्रथम क्रमांक. ३. आंतरशालेय स्पर्धांपासून राष्ट्रीय पातळीवरील 

अनेक वक्तृत्व, वादविवाद तसेच निबंध स्पर्धांमधून बक्षिसे व पारितोषिके. 

४. २२ वर्षे मुंबईत वैद्यकीय व्यवसाय. ५. मी मराठी वाहिनीवरील 'लज्जतदार 

खाना' कार्यक्रमात गेली तीन वर्षे 'आरोग्य विचार'. ६. अनेक दिवाळी अंकांमधून 

वैद्यकीय व इतर साहित्य प्रकाशित. ७. लोकसत्तामध्ये वैद्यकीय लेखांना प्रसिद्धी. 

८. साहित्य संमेलनांमधून सहभाग. ९. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित सामाजिक कार्य. १०.

सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग व अनेक सामाजिक संस्थांशी जवळचा संबंध.


Swadishta Aarogya - Dr.Sanjeevani Rajwade

स्वादिष्ट आरोग्य - डॉ. संजीवनी राजवाडे

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Dr.Sanjeevani Rajwade

  • No of Pages: 236
  • Date of Publication: 2015-07-20
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-85266-13-3
  • Availability: 50
  • Rs.280.00
  • Rs.224.00