Suez - Panama
स्थापत्य अभियांत्रिकीचा अद्भुत आविष्कार म्हणून आज सुएझ-पनामा कालव्यांकडे पहिलं जातं. जगातील मानवनिर्मित आश्चर्यांपैकी एक असणारे हे दोन कृत्रिम कालवे व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. कारण लंडन ते मुंबई या समुद्री प्रवासासाठी पूर्वी 19,800 किलोमीटरचे अंतर पार करावे लागत असे. सुएझ कालव्यामुळे हा प्रवास 11,600 किलोमीटरवर आला आहे. त्याचप्रमाणे प्रशांत महासागरातून अटलांटिक सागरात पोहोचण्यासाठी बोटींना दक्षिण अमेरिका खंडाला घालावा लागणारा दीर्घ पल्ल्याचा वळसा पनामा कालव्यामुळे वाचला आहे. त्यामुळे सॅन फ्रान्सिस्को ते न्यू यॉर्क शहर यामधलं अंतर 20,900 किलोमीटरवरून 8,370 किलोमीटर इतकं कमी झालं आहे.
एका अर्थाने या दोन कृत्रिम कालव्यांनी जलवाहतुकीच्या माध्यमातून जगातल्या बहुतांश देशांना परस्परांशी जोडलं आहे. अशा या कालव्यांच्या निर्मितीची गोष्ट मात्र अद्भुत वाटावी अशी आहे. आजच्यासारखं प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नसताना शंभर-दीडशे वर्षांपूर्वी अभियांत्रिकीचा हा चमत्कार कसा काय घडवून आणला असेल? आजवर न ऐकलेली सुएझ-पनामा कालव्यांच्या निर्मितीमागची ही कहाणी अबालवृद्धांना जखडून ठेवेल अशीच आहे.
Suez - Panama | Laxman Londhe
सुएझ-पनामा | लक्ष्मण लोंढे