Antarang
केतकर हे सर्वव्यापी आणि अर्थातच सर्वस्पर्शी आहेत, हे त्यांच्या
या लिखाणाच्या सर्व व्यापावरून दिसून येते. त्यांनी लिहिलेल्या,
परंतु यात समाविष्ट नसलेल्याही काही प्रस्तावना असतील आणि
कदाचित त्या खंड दोनमध्ये प्रकाशित होतील.
मला अनेक जण विचारतात, ‘केतकर कसे आहेत?’ केतकर हे स्वभावाने
म्हणाल तर ‘मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास’ आहेत. ते कधी चिडल्याचे
मी पाहिलेले नाही. तसे ते शांत नाहीत; तरी एखाद्या खोडकर, पण निरागस
मुलाइतकेच ते आहेत. या प्रस्तावना म्हणजे त्यांच्या स्वभावशैलीचा एक सुंदर
कोलाज आहे. त्यांच्या स्वभावातला प्रत्येक पैलू आपल्याला या चित्रणात
पाहायला मिळतो. त्यांचे लेखन हे निर्दोष असते आणि आमच्यासारख्यांच्या
लेखनात जे शेवटच्या क्षणापर्यंत शोध घेतले जातात, ते त्यांच्या लेखनात
कधीही दिसत नाहीत.
- अरविंद व्यं. गोखले
Antarang | Kumar Ketkar
अंतरंग । कुमार केतकर