lajjatdar_aarogya
साधारणपणे ३० ते ४० टक्के आजार बरे करणं हे सहसा गृहिणीच्या हातात असतं.
रोजचा आहार आणि त्याच्याशी निगडित असणाऱ्या लहान-सहान गोष्टींविषयक
सल्ला मी मराठी वाहिनीवर डॉ. संजीवनी राजवाडे देत असतात.
अशाच गोष्टींविषयक सविस्तर अनुभव सांगत आहेत त्या या पुस्तकातून. आपल्या
अवतीभवती असणारी फळे-भाज्या-धान्य-मसाले इत्यादींची उपाययोजना घरात
सहजपणे करून काही रोगांवर डॉक्टरकडे न जाता विजय मिळवता येतो हे या
लिखाणातून विस्तृतपणे सांगितले आहे. निरोगी व्यक्तीने निरोगी राहण्याकरिता व
रोगग्रस्त व्यक्तीने रोगमुक्त होण्याकरिता प्राथमिक स्वरूपात काय करता येईल ते
या पुस्तकातून वाचकांसमोर येतं. ऋतू आणि प्रकृतीनुसार होणाऱ्या बदलांचा विचार
करून आरोग्याची संकल्पना आपल्यासमोर लेखिकेने मांडलेली आहे.
कीचनमध्ये कमीतकमी वेळात एखादे औषध कसे तयार करून देता येईल याचे
कौशल्यपूर्वक मार्गदर्शन डॉ. संजीवनी राजवाडे यांनी केलेले आहे.
लेखिकेविषयी...
१. शालान्त परीक्षेत मराठी विषयात द्वितीय क्रमांक
२. बी.ए.एम.एस.ला नागपूर विद्यापीठातून प्रथम क्रमांक.
३. आंतरशालेय स्पर्धांपासून राष्ट्रीय पातळीवरील अनेक वक्तृत्व,
वादविवाद तसेच निबंध स्पर्धांमधून बक्षिसे व पारितोषिके.
४. २२ वर्षे मुंबईत वैद्यकीय व्यवसाय.
५. मी मराठी वाहिनीवरील 'लज्जतदार खाना' कार्यक्रमात गेली तीन वर्षे
आरोग्य विचार'.
६. अनेक दिवाळी अंकांमधून वैद्यकीय व इतर साहित्य प्रकाशित.
७. लोकसत्तामध्ये वैद्यकीय लेखांना प्रसिद्धी.
८. साहित्य संमेलनांमधून सहभाग.
९. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित सामाजिक कार्य.
१०. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग व अनेक सामाजिक संस्थांशी जवळचा संबंध.
lajjatdar aarogya - Dr.Sanjeevani Rajwade
लज्जतदार आरोग्य - डॉ. संजीवनी राजवाडे