Sattekadun Satyakade

New -20% Sattekadun Satyakade

सबलांविरुद्ध दुर्बलांचा आवाज उठविण्याचा पहिला प्रयत्न चार्वाकांनी केला. 

पुढेबुद्ध व महावीराने त्यांच्या आवाजात आपला सूर मिसळला. त्याच काळात 

थेल्स, पायथागोरस, सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटलही झाले. येशूने सेवाधर्म 

आणला. या साऱ्यांनी चार्वाकांचे ध्वज उंचावले. मुस्लीम राजवटीत सुफी संतांनी

माणुसकीचा संदेश सांगितला. शंकराचार्यांच्या अद्वैतापासून रामानुज, वल्लभ, 

मध्व व निंबार्क यांनीही नियतीने निर्माण केलेले मानवी स्वरूप सांगितले.

त्यातल्या कुणी अद्वैत तर कुणी द्वैत म्हटले. पण माणुसकीचा त्यांचा संदेश 

एकच होता.


पुढे संत व महात्मे आले. कबिरांपासून आयवाळ संतांपर्यंत, ज्ञानेश्वरांपासून

तुकारामांपर्यंत आणि पुढे आगरकरांपासून गांधी व आंबेडकरांपर्यंत साऱ्यांनी

अंत्योदयाचा व माणसाच्या उन्नयनाचा मार्ग सांगितला. ही परंपरा थांबली नाही.

जागतिक, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरही त्यांचे अवतार येतच राहिले. या

साऱ्यांनी माणसांच्या एकात्मतेएवढाच त्यांच्यातील समतेचा मार्ग सांगितला.

कारण पूर्वीची सारी परंपरा विषमतेची होती. तीत जुलूम होते, हिंसाचार,

नरसंहार आणि बलात्कार होते. शिवाय या विषमतेमध्ये धर्म, अर्थ व राज्य 

या सगळ्या गोष्टीही सामील होत्या. त्या सामर्थ्यशाली होत्या. त्यांच्याविरुद्ध 

आवाज उठवायचा तर ती बाब मृत्युदंड, छळ, यातना, जिवंत समाध्या, 

जलसमाध्या किंवा जिवंत जाळण्यापासून उकळत्या तेलात तळण्यापर्यंतचे 

अनाचार होते. तरीही माणुसकीचा आवाज शमला नाही. आज एवढी शतके 

झाली,  लोक सम्राटांना विसरले. त्यांची राज्ये विस्मरणात गेली. साऱ्या 

जगाच्या आठवणीत  फक्त हे महात्मे राहिले आणि ते पुढेही राहणार आहेत.

त्यांच्या त्यागाची आणि अखेरच्या विजयाची ही कथा.


Sattekadun Satyakade | Suresh Dwadashiwar

सत्तेकडून सत्याकडे । सुरेश द्वादशीवार

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Suresh Dwadashiwar

  • No of Pages: 152
  • Date of Publication: 25-09-2025
  • Edition: First
  • ISBN: 978-93-6374-296-3
  • Availability: 100
  • Rs.199.00
  • Rs.160.00