‘गुगल’ हा शब्द पहिल्यांदा ऐकायला विचित्र वाटतो. पण अलीकडे हा विचित्र शब्द न ऐकलेला साक्षर मध्यमवर्गीय माणूस सापडणं कठीण आहे. तरुणांचं तर पानसुद्धा गुगलशिवाय हलत नाही. आता तर चक्क शब्दकोशामध्ये ‘गुगल’ हा शब्द एक क्रियापद म्हणून अधिकृतरीत्या समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे ‘मी माहिती शोधली’ याला लोक सरळ ’ख सेेसश्रशव’ असं इंग्रजीमध्ये म्हणतात! एका दशकाहून थोडा जास्त काळ अस्तित्वात असलेल्या आणि स्टॅनफर्डमधल्या दोन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या कंपनीचा प्रवास अत्यंत रंजक आणि अविश्वसनीय आहे. त्यातून लोकांना पडत असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळतील. त्यातले नमुन्यादाखल काही प्रश्न असे :
* गुगलचे निर्माते कोण आणि कुठले आहेत?
* गुगल कंपनीला पैसे कुठून मिळतात?
* गुगलचं सर्च इंजिन सर्वोत्तम का मानलं जातं?
* जीमेल, यूट्यूब, अँड्रॉईड हे सगळं कुठून आलं?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं, गुगलच्या प्रवासाचा आलेख रेखाटणारं आणि त्याची सक्सेस स्टोरी सांगणारं हे पुस्तक आहे.
Google : Atul Kahate
गुगल : अतुल कहाते
Your shopping cart is empty!