Aamchya Shikshanache Kay?
सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आला अजूनही देशात ३ कोटी, तर महाराष्ट्रात ९ लाख बालके शाळेबाहेर...
बालमजूर राबताहेत, रस्त्यावरची लेकरं भीक मागताहेत, साखर कारखान्यांच्या बॉयलर व विटभट्ट्यांत शिक्षण भाजलं जातंय, दगडखाणीत शिक्षणाच्या ठिकऱ्या उडताहेत, आदिवासी लेकरं जंगलातच, तर भटक्यांची पोरं गावोगाव भटकताहेत... लालबत्तीखाली तर अजूनही अंधारच...
या ३ कोटी शालाबाह्य लेकरांना तसंच ठेवून देश महासत्ता होईल का? सेन्सेक्सच्या विकासदराच्या वाजणाऱ्या ढोलताशांत सरकारला, व्यवस्थेला आणि तुम्हाला, मला ही लेकरं आर्तपणे विचारताहेत -
आमच्या शिक्षणाचं काय ?
आमच्या शिक्षणाचं काय ? बालकामगार, रस्त्यावरची मुलं, स्थलांतरित मजुरांची मुलं तसेच वेश्यावस्ती, मुस्लीम, आदिवासी आणि भटक्या-विमुक्त जमाती यांच्या शालाबाह्य मुलांचा, महाराष्ट्राच्या २० जिल्ह्यांत प्रत्यक्ष फिरून या उद्ध्वस्त बालपणाचा मांडलेला हा लेखाजोखा...
Aamchya Shikshanache Kay? : Heramb Kulkarni
आमच्या शिक्षणाचं काय? हेरंब कुलकर्णी