Chala, Karodpati Houya!

-20% Chala, Karodpati Houya!

कुटुंबाचा गाडा प्रगतीकडे न्यायचा असेल, तर घरातल्या प्रत्येक महिलेकडे आर्थिक शहाणपण असलं पाहिजे. ती आर्थिक साक्षर झाली पाहिजे. म्हणजेच आर्थिक शिस्तीबरोबरच हाती येणाऱ्या पैशाचं व्यवस्थापन करण्याची शास्त्रशुद्ध कला तिच्याकडे असायला हवी. ती अंगी बाणायची असेल तर अनिल पाटील लिखित ‘चला, करोडपती होऊया' हे पुस्तक प्रत्येक महिलेनं वाचलंच पाहिजे.
हे पुस्तक महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर तर बनवतंच पण त्याचबरोबरीनं अर्थसाक्षर झालेल्या महिलांना श्रीमंतीची वाटही दाखवतं. मुलांच्या शिक्षणपासून वृद्धापकाळातील आधारापर्यंतचं आर्थिक नियोजन कसं करावं आणि हाती येणारा पैसा कसा वाढवला जाऊ शकतो याची शास्त्रशुद्ध परंतु सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने माहिती देणारं हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं.


विभाग पहिला : आर्थिक शहाणपण आणि स्त्रिया 1. पैशांचं जग 2. पैशांच्या जगाची माहिती करून घेताना... 3. पैशांचा प्रवाह आणि आर्थिक व्यवहार 4. आर्थिक शहाणपण का हवं? 5. मुलांच्या शिक्षणाचं नियोजन कसं कराल? 6. कुटुंबाचं आर्थिक नियोजन कसं करायचं ?

विभाग दुसरा : करोडपती बनताना... 7. गुंतवणुकीविषयी जाणून घेताना... 8. गुतवणूक करताना... 9. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड : श्रीमंतीचा हमरस्ता 10. परतावा आणि व्याजाचं गणित 11. मृत्युपत्र वेळीच लिहायला हवं
माझ्या गरजांसाठी आवश्यक तेवढे पैसे खर्च करून बाकी पैसे साठवायला प्राधान्य द्यायला हवं, हा विचारदेखील करण्याची आवश्यकता असते. याचं एक महत्त्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे पुढं कायकाय प्रसंग आपल्यावर ओढवू शकतात, काय अनपेक्षित संकटं येऊ शकतात हे आपल्याला माहीत नसतं. सावधगिरी म्हणून याचा विचार प्रत्येक स्त्रीनं करायला हवा. आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे कोणकोणत्या भूमिका पार पाडाव्या लागणार आहेत, कोणत्या स्तरावर कोणत्या आर्थिक अडचणी येऊ शकतात, याचा गांभीर्याने विचार करून आपल्याकडे येणाऱ्या पैशाचं नियोजन करण्याची गरज आहे. हे ज्यांना कळेल त्याच स्त्रिया खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची शक्यता असते.यासाठी प्रत्येकीलाच आर्थिक शहाणपण आणि शिस्त समजावून घ्यावी लागेल तरच त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन कुटुंबाला आर्थिक भक्कमता देऊ शकतील. पैशाच्या ताकदीची जाण असलेली महिला आपल्या कुटुंबाला समृद्ध करू शकते. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सदैव सुख, समाधान अन् आर्थिक समृद्धता हवी असेल, तर उत्तम आर्थिक व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. ही जबाबदारी पती-पत्नी आणि कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची असते. आपल्याकडे जे पैसे येतात, त्यातले किती खर्च करायचे व किती रक्कम भविष्यासाठी गुंतवायची, ही एक शास्त्रशुद्ध कला आहे. ती कला अवगत केल्यास महिलांना संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक नियोजन करण्यास सोपे जाईल. मात्र त्यासाठी स्त्रियांनी पहिल्यांदा आपल्या आजूबाजूला असलेलं हे पैशांचं जग नेमकं काय आहे, त्यात आपलं काय स्थान आहे, हे समजून घ्यायला हवं.एकूणच सगळीकडे दोन प्रकारच्या महिला पाहावयास मिळतात. एक स्वतःचं उत्पन्न असणारी किंवा कमावती महिला अन् दुसरी स्वतःचं उत्पन्न नसलेली महिला. आजच्या बदलत्या काळातही भारतातल्या तब्बल 84 टक्के महिला आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून आहेत. त्यांना पैशासाठी दुसऱ्यासमोर सतत हात पसरावे लागतात. देशात सर्वसाधारणपणे 69 कोटी महिला असतील; पण अशिक्षित आणि स्वतःचं उत्पन्न नसलेल्या महिलांची संख्या जास्त आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील कमावत्या महिलांचं प्रमाण फारच कमी आहे. जपानसारख्या देशात 54 टक्के महिला कमावत्या आहेत. चीनमध्ये हेच प्रमाण 72 टक्क्यांपर्यंत, तर भारतात केवळ 15 टक्क्यांपर्यंत आहे.

मनोगतप्रत्येक घरातील महिला आर्थिक साक्षर झाली पाहिजे. तिच्याकडे आर्थिक शहाणपण आलं पाहिजे तरच, त्या कुटुंबात आर्थिक शिस्त निर्माण होईल, ती करोडपती होईल आणि तिचे कुटुंब आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करेल, असं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. आपल्या देशात आर्थिक निरक्षरता प्रचंड मोठ्या प्रमाणात ठासून भरलेली आहे आणि हा आजचा ज्वलंत प्रश्न बनलेला आहे. पैसे मिळविण्यासाठी वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले जाते. परंतु या शिक्षणामुळे मिळविलेल्या पैशाचं व्यवस्थापन कसं करावं? याचं ज्ञान कुठेही शिकविलं जात नाही. त्यामुळे डॉक्टर, इंजिनीअर, बँक अधिकारी, प्राध्यापकमंडळी तसेच उच्चशिक्षित नोकरदार सर्वजण या व्यवस्थापनेच्या बाबतीत मागे आहेत. या निरक्षरतेचा परिणाम विशेषतः ग्रामीण सर्वसामान्य महिलांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आर्थिक निरक्षरतेचा गैरफायदा अनेक कंपन्या आजही घेताना दिसतात. अनेक महिलांनी पै पै करून साठविलेला पैसा जादा व्याज मिळतं म्हणून अशा कंपन्या, संस्था, बँकांमध्ये गुंतवला गेला आणि आज त्या कंपन्या, संस्था व बँका बुडून वर्षानुवर्षे झाली तरी त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत. संचयनी, पल्स यांसारख्या बोगस कंपन्यांनी एजंटांना भरमसाठ कमिशन दिलं, कोट्यवधींची गुंतवणूक घेऊन त्या कंपन्या नंतर बंद पडल्या आहेत. आज आयुर्विमा घराघरांत पोहचला आहे, परंतु 90 टक्के लोकांनी पुरेसा विमा घेतला नसल्याने अनेक विधवा महिला पैशाविना जीवन कंठत आहेत. बँकांमध्ये दिवसेंदिवस व्याजदर कमी कमी होत आहेत. कित्येक पालकांना चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यानं योग्य वेळी मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उपलब्ध करता आलेला नाही. साठीनंतर अनेक महिलांकडे पैशाचा प्रवाह नसल्याने त्या आपल्याच घरात अडगळ बनल्या आहेत. घरात आर्थिक शिस्त नसल्याने गरजेच्या वेळी पैसा मिळत नाही. नको त्या ठिकाणी पैसा खर्च होतो.तसेच पैसा येतो कसा आणि जातो कसा याचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे कुटुंबात आर्थिक कलह निर्माण होत आहेत. हे सर्व परिणाम या अज्ञानामुळे दिसत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात पैशाचे व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा असूनही आपण सारे या पैशाच्या व्यवस्थापनाविषयी निष्काळजी आहोत. आजही आपण पैशाची गुंतवणूक करताना वडीलधारी मंडळी, बँकेतील अधिकारी, जवळचा मित्र, नातेवाईक, विमा एजंट अशा व्यक्तींकडून सल्ला घेतो, जे पैशाच्या व्यवस्थापनाविषयी अंध आहेत. अशा अंध लोकांचा सल्ला त्या कुटुंबाला आर्थिक अंधाराकडे घेऊन जातो. केलेल्या गुंतवणुकीचे मुदतीनंतर पैसे कमी दराने तसेच भरलेल्या पैशांपेक्षा कमी मिळाले, कंपनी बंद पडली, बँक, संस्था बुडाली, नेमक्या गरजेवेळी पैसे मिळाले नाहीत तसेच रोख शिल्लक वर्षानुवर्षे घरात किंवा खात्यात पडून आहे असे चुकीचे व्यवहार पहावयास मिळत आहेत. पण वेळ गेलेली असते आणि गुंतवणुकीबाबत आपला निर्णय चुकलेला आहे हे लक्षात येते. यासाठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारे ज्ञान आम्ही या पुस्तकाद्वारे देत आहोत. प्रत्येक महिलेला या पुस्तकातून आर्थिक व्यवहाराचे कौशल्य प्राप्त होणार आहे, त्यामुळे प्रत्येक घराघरांत हे पुस्तक असलंच पाहिजे अशी माझी मनोभावना आहे. महिलेला आर्थिक सक्षमतेकडे नेऊन योग्य ते शहाणपण मिळाले तर तिच्या घरात एक आर्थिक शिस्त लागणार आहे. पैशाचे व्यवस्थापन प्रभावीपणे होईल, वायफळ खर्चाला आळा बसेल, गरजेच्या वेळी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मुलांच्या शिक्षणासाठी योग्य ठिकाणी तरतूद होईल आणि मुले आकाशाला गवसणी घालतील. आर्थिक अज्ञानामुळे होणारी आर्थिक फसवणूक टळेल. रिटायरमेंट काळात चांगला पैसा मिळाल्याने उर्वरित आयुष्य आनंदात जाईल. हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने अत्यंत देखण्या स्वरूपात प्रकाशित केले आहे त्याबद्दल मनोविकासचे अरविंद पाटकर आणि आशिश पाटकर, संपादक विलास पाटील, अमिता नायडू, मुखपृष्ठकार गिरीश सहस्रबुद्धे व इतर टीमचे मनःपूर्वक आभार. चला तर मग महिलांनो आर्थिक सक्षमतेकडे जाऊ या...प्रवर्तक एसपी वेल्थ, कोल्हापूर अनिल पाटील


लेखक परिचय
• 1987 साली आयुर्विमा प्रतिनिधी म्हणून करिअरची सुरुवात.
• 1993 ते 2003 - सहकारी बँकेत नोकरी.
• 2008 पासून म्युच्युअल फंड सल्लागार म्हणून कार्य.
• कुटुंबाचे आर्थिक नियोजन कसे करावे यासह गुंतवणुकीशी संबंधित विविध प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण.
• 2015 साली ‘कुटुंबाचा अर्थसंकल्प' हा प्रकल्प सादर करून शिवाजी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना गुंतवणूकविषयक मार्गदर्शन. विद्यापीठाकडून उत्कृष्ट आर्थिक सल्लागार म्हणून गौरव.
• ‘कुटुंबाचे आर्थिक नियोजन' या विषयावर 200 हून अधिक कार्यशाळा.
• 2018 साली एस. पी. वेल्थ या कंपनीची स्थापना. कंपनीच्या विविध आर्थिक सल्लासेवांचा आजवर 2000 कुटुंबांना लाभ. सुमारे 300 कोटींच्या निधीचे व्यवस्थापन.
• ‘कुटुंबाचा अर्थसंकल्प' हे कुटुंबाच्या आर्थिक समृद्धीसाठी मार्गदर्शक ठरणारे पुस्तक प्रकाशित.
• आर्थिक साक्षरता वाढीस लागावी म्हणून विविध नियतकालीकांमधून सातत्याने लेखन.
• दी इकॉनॉमिक टाइम्स प्रस्तूत एफ.एफ.एफ. क्लबचा ‘डायमंड' अवार्ड व आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रोटरी क्लब, शिरोलीचा ‘व्होकेशनल' अवार्ड प्राप्त.


Chala, Karodpati Houya!
Anil Patil । Edited by Amita Naidu
चला करोडपती होऊया : महिलांसाठी गुंतवणुकीचे धडे
अनिल पाटील । संपादन – अमिता नायडू

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Anil Patil

  • No of Pages: 224
  • Date of Publication: 30-11-2023
  • Edition: First
  • ISBN: 978-93-964937-6-9
  • Availability: 98
  • Rs.299.00
  • Rs.239.20