Tumchi_Zop_Tumchaya_Hati
प्रिय वाचक, "तुमची झोप तुमच्या हाती'ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा झालेल्या समारंभात मी असं म्हटलं होतं की, माझी लेक बाचकांना देत आहे: त्यानी ती स्वीकारावी. वाचकांनी तिला खुल्या मनाने स्वीकारली आहे, याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. अनेक वर्षांच्या अनुभवाचं सार वाचकांपर्यंत पोहोचल्याचा तो आनंद आहे. परंतु या क्षणी मात्र माझ्या भावना संमिश्र आहेत. भावना समिश्र आहेत अस म्हणण्याचं कारण असं की, झोपेवरचं पुस्तक इतक्या झपाट्याने संपतं याचा अर्थ आपल्या समाजाचं मानसिक आरोग्य ठीक नाही! अनेक माणसांना खरोखरच झोपेच्या आणि तदनुषंगिक मानसिक समस्यांनी ग्रासलेलं आहे. आपल्या समाजाच्या या अस्वस्थ परिस्थितीने मन व्यथित होत आहे. आपल्या समाजातलं मानसिक अस्वास्थ्याचं दुष्टचक्र कुठे तरी थांबवायला हवं आणि त्या दृष्टीने हा माझा एका मिणमिणत्या पणतीचा प्रयत्न आहे. अशा प्रकारची पुस्तक इंग्रजीमध्ये उपलब्ध असतात हे तर सर्वज्ञात आहे; परंतु प्रत्येक वेळी इंग्रजीकडे आशाळभूतपणे पाहायला लागू नये, असा बाड्मय प्रकार मराठीत निर्माण करणं शक्य आहे आणि त्याला वाचकांकडून उदंड प्रतिसाद मिळू शकतो, हेच या पुस्तकाने सिद्ध होत आहे. वाचकांनी या पुस्तकाच्या निमित्ताने पत्र पाठवून मनमोकळी दाद दिली, आभार मानले, याबद्दल मी बाचकांचा कृतज्ञ आहे.
Tumchi Zop Tumchaya Hati : Dr.Rajendra Barve
तुमची झोप तुमच्या हाती : डॉ. राजेंद्र बर्वे