The Radical In Ambedkar
सूरज एंगडे आणि आनंद तेलतुंबडे यांनी संपादित केलेला हा संग्रह
म्हणजे एक लँडमार्क असून, आधुनिक भारतातील स्वातंत्र्य आणि
समतेचे खंदे पुरस्कर्ते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा
आहे, तिला बळकटी आणणारा आहे. भारतातील लोक आंबेडकरांचा
सामाजिक परिवर्तनाचा दूत, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार
म्हणून गौरव करतात. परंतु याहीपलीकडे जात, प्रस्तुतचा लक्षणीय
ग्रंथ हा आंबेडकरांच्या वारशातील मूलगामित्व उलगडवून दाखवणारा
असून, यासाठी त्यांच्या जीवनातील अद्यापि दुर्लक्षित राहिलेल्या पैलूंची
येथे चिकित्सा करण्यात आली आहे.
मुख्यत्वे ‘दलित अस्मितेचा आदर्श’ म्हणून लाखो लोकांसाठी आंबेडकर
वंदनीय असले तरी, त्याचबरोबरीने ते भारतीय इतिहासाचे, समाजव्यवस्थेचे
आणि परराष्ट्रधोरणाचे एक गंभीर अभ्यासक होते, हे विसरून चालणार नाही.
तसेच ते प्रारंभीच्या काळातील मानवी अधिकारांचा पुरस्कार करणारे पहिले-
वहिले वकील होते, एक पत्रकार होते आणि एक राजनीतिज्ञ देखील होते.
द रॅडिकल इन आंबेडकर हा ग्रंथ म्हणजे प्रचंड मोठी व्याप्ती असणारा आणि
प्रकांड विद्वत्तेने भारलेला एक विलक्षण लेखसंग्रह असून त्याचा आवाका हा
आंबेडकरांच्या प्रचलित प्रतिमेच्या पल्याड जाणारा आहे. नव्या जगाचे स्वप्न
पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा ग्रंथ आहे.
The Radical In Ambedkar Edited By : Suraj Yengde | Anand Teltumbde
Translated By : Shekhar Sathe, Vandana Bhagwat, Nitin Jarandikar
द रॅडिकल इन आंबेडकर । संपादन : सूरज एंगडे, आनंद तेलतुंबडे
अनुवाद : शेखर साठे, वंदना भागवत, नितिन जरंडीकर
