Jim Corbett - Box

-20% Jim Corbett - Box

जंगल लोअर् | Jungle Lore

मूळ लेखक : जिम कॉर्बेट | अनुवाद : विश्वास भावे

ङेीश म्हणजे ज्ञान, विद्या, शास्त्र. जिम कॉर्बेट ह्या जगप्रसिद्ध निसर्गवेड्या

शिकार्‍याच्या मते जंगलविषयक ज्ञान नुसतं पुस्तकातून मिळवता येत नाही किंवा

डोळ्याला झापडं लावून फिरताना कळत नाही. तर सतत भटकंती करताना

निसर्गाशी समरस होऊन हळूहळू अंगिकारता येतं. एकदा का ते तुमच्या अंगात

भिनलं की मग झाडं, गवत, दगडधोंडे, माती, आकाश, प्राणी ह्यांचं स्वतंत्र अस्तित्व

राहत नाही तर त्यांच्या परस्परावलंबनातून एकजीव असं तालबद्ध गाणं तयार

होतं. कॉर्बेट अगदी लहानपणापासून जंगलाशी जवळचं नातं ठेवून होता. तो जात्याच

शिकारी जरी असला तरी तो शिकार ह्या गोष्टीकडे खेळ म्हणून पाहत असे. तो

बंदुकीच्या ट्रीगरपेक्षा कॅमेर्‍याच्या बटनावर प्रेम करत असे.

‘जंगल लोअर्’ ह्या पुस्तकात जिमने शिकारकथा तर सांगितल्या आहेतच पण

त्याचबरोबर त्याला लहानपणापासून जंगल कसं शिकायला मिळालं हेही त्यानं

मांडलं आहे. एका अर्थाने त्याने अनुभवलेली निसर्गाची धडकन्च तो आपल्याशी या

पुस्तकाद्वारे शेअर करतोय. त्याचबरोबर कुमाऊँच्या खेडेगावातील लोकांच्या स्वभावाचं मार्मिक वर्णन,

हिमालयाच्या फूटहिल्सचं वर्णन, हाकारे, रोमहर्षक जंगल डियेक्टीव्ह स्टोरीज

ह्यांनी हे पुस्तक खच्चून भरलंय.

तेव्हा निसर्गप्रेमींची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलणारं आणि त्यांना निसर्गाशी,

ऋतुचक्राशी संवाद करायला भाग पाडणारं असं हे पुस्तक आपल्या संग्रही

असायलाच हवं.


मॅन इटर्स ऑफ कुमाऊँ | Man Eaters of Kumaoon

हिमालयीन रेंजेसमधील कुमाऊँ प्रांतात धुमाकूळ घालणार्‍या नरभक्षक प्राण्यांना

आपल्या अचूक नेमबाजीने टिपणार्‍या जिम कॉर्बेट यांची लेखणीही तितयाच

ताकदीने चालत असे. भारतीय जंगलातील निसर्ग आणि वन्य प्राणी या संबंधातील

अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

नरभक्षक प्राण्यांच्या मागावरून त्यांचा केला जाणारा सावध पाठलाग, त्यांचा

आसपासचा भीतीदायक वावर, मोर किंवा लंगूर यांचे अलार्म कॉल, रात्रभर

मचाणावर बसून ते वाट पाहणे, हे सगळे वाचणे म्हणजे एखादी थ्रीलर फिल्म

पाहण्यासारखेच वाटते.

प्रस्तुत पुस्तकातील नरभक्षकांच्या शिकारकथा वाचताना वाचकांच्या डोळ्यांपुढे

कुमाऊँ प्रांतातील सर्व निसर्ग जसाच्या तसा उभा राहील.

अनुवादक विश्वास भावे हेही जंगलप्रेमीच! नेहमी जंगलात रमणारे. त्यामुळे

जंगलातल्या परिभाषेशी परिचित आहेत म्हणून अनुवादात सहजता येते आणि

अनुवाद मूळ पुस्तकाएवढा वाचनीय होतो.


माय इंडिया | My India

एक जिंदादिल माणूस,

एक सहृदय शिकारी,

जंगलप्रेमी,

निसर्गप्रेमी आणि वन्यपशुप्रेमी..!

मालयाच्या कुमाऊँ प्रदेशात राहणारे जिम कॉर्बेट

इथल्या परिसरात मनापासून रमले. रेल्वेत जसे ते

रममाण झाले होते तसेच ते इथल्या जंगलातील

आदिवासींमध्ये आणि खेड्यातील अशिक्षित

माणसांमध्ये समरस झाले होते.

त्यांची सुख-दु:खे त्यांनी वाटून घेतली.

या माणसांच्या स्वभावाचे,

त्यांच्या समजुतींचे, चालीरीतींचे

अतिशय छान वर्णन त्यांनी केले आहे.

या माणसांचा प्रामाणिकपणा, निष्ठा आणि भोळेपणा

यामुळे ही माणसे त्यांची झाली.

म्हणून त्यांचा देशही माझाच या भावनेने

लिहिलेलं पुस्तक म्हणजे ‘माय इंडिया’.

मूळ इंग्रजी पुस्तकाचा तोल आणि ताल सांभाळून

केलेला हा अनुवाद, वाचकांना निश्चितच आवडेल.


मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग | Man Eating Leopard of Rudraprayag

मूळ लेखक : जिम कॉर्बेट | अनुवाद : विश्वास भावे

हिमालयीन फूटहिल्स आणि गढवाल प्रदेशातील चारधाम यात्रा करणार्‍या

यात्रेकरूंना आणि स्थानिक गढवाली लोकांना, एका नरभक्षक बिबळ्याची प्रचंड

दहशत होती. घराबाहेर पडण्याची भीती वाटणार्‍या या बिबळ्याने आठ वर्षांत

जवळपास १२५ माणसांचे बळी घेतले होते. जिम कॉर्बेटने आपला सहकारी

इबॉटसनबरोबर या बिबळ्याची शिकार करण्याची मोहीम आखली. मानवी

रक्ताला चटावलेला हा धूर्त बिबळ्या जंगजंग पछाडूनही आणि बंदुकीच्या टप्प्यात

येऊनही सहीसलामत सुटत असे. सतत आठ वर्षे चकवा देणार्‍या या बिबळ्याने

जिम कॉर्बेटसारख्या निष्णात शिकार्‍याला पार निराश करून टाकले होते. शेवटी

‘अगदी शेवटचे दहा दिवस प्रयत्न करून पहावा.’ अशा विचाराने सतत दहा रात्री

मचाणावर बसलेल्या कॉर्बेटच्या गोळीला, अखेर अकराव्या रात्री हा बिबळ्या बळी

पडला आणि प्रचंड दहशतीखाली वावरणारी गढवाली जनता भयमुत झाली!

बिबळ्याची दहशत, गढवाल आणि हिमालयीन फूटहिल्सचे चित्रदर्शी वर्णन,

साध्या-भोळ्या गढवाल लोकांचं साधंभोळं वागणं आणि जिम कॉर्बेटचे अथक प्रयत्न

असं सारं काही या पुस्तकात अनुभवायला मिळतं. जणू काही आपण एखादी थ्रिलर

फिल्मच पाहत आहोत असा अनुभव देणारं हे पुस्तक एकदा तरी वाचायलाच हवं!


टेम्पल टायगर | Temple Tiger

कुमाऊँमधल्या एका वाघाची शिकार करण्यात जिम कॉर्बेटला आलेल्या अपयशाच्या

एका रम्य शिकारकथेने प्रस्तुत पुस्तकाची सुरुवात होते. सोबतच काही न

सांगितलेल्या शिकारकथांचा समावेश कॉर्बेटने या पुस्तकात केलेला आहे.

या पुस्तकापासून सुरू झालेला एकाहून एक सरस आणि सुरस ‘मॅन इटर्स ऑफ

कुमाऊँ’ शिकारकथांची रंजक सांगता जिमने या पुस्तकाद्वारे केली आहे. एक

हाडाचा शिकारी असूनही जंगलातल्या एकूण जैवविविधतेविषयी त्याचं सदैव

जागृत असणारं संवेदनशील मन आपल्याला याही पुस्तकात जाणवत राहतं. शिवाय

हे सगळं करत असताना त्याने दाखवलेली उच्च दर्जाची शारीरिक क्षमता व संयमही

आपल्याला अवाक् करून सोडतो. कुमाऊँ-गढवालमधले प्राणी व माणसं याविषयी

सारख्याच ममत्वाने लिहिणारा जिम एक माणूस म्हणूनही आपल्यासमोर उभा

राहतो आणि वाचकाला एक आगळी दृष्टी बहाल करतो. या दृष्टीसाठी आणि जिम

कॉर्बेटच्या जिंदादिलीसाठी हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं!


Jim Corbett, Vishwas Bhave, Advait Gokhale

 जिम कॉर्बेट ,विश्वास भावे , अद्वैत गोखले


Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Jim Corbett, Vishwas Bhave, Advait Gokhale

  • Translator: Vishwas Bhave, Advait Gokhale
  • No of Pages: 864
  • Date of Publication: 15/01/2023
  • Edition: First
  • ISBN: 978-93-91547-85-1
  • Availability: 100
  • Rs.1,080.00
  • Rs.864.00