Jatichi Khadadi
Click Image for Gallery
भौगोलिक परिस्थिती, सामाजिक, आर्थिक स्तर आणि उपलब्ध होणारी संसाधनं असे सभोवतालचे घटक माणसाच्या जगण्यावर, विकासावर जमा परिणाम करतात तसाच ते खाद्य पदार्थ बनवण्याच्या पद्धतीवरही परिणाम करत असतात. त्यातूनच त्या त्या परिसराची, समाजाची आणि त्या त्या जातीची स्वतःची अशी एक खाद्यसंस्कृती तयार होते. किंबहुना परंपरागत असे विशिष्ट खाद्यपदार्थ हे त्या त्या समूहाची अभिमानास्पद ओळख बनतात. त्यामुळे त्या त्या समूहाकडून आपापले पदार्थ जात जपावी इतक्या आत्मीयतेनं त्याच्या मूळ चवीसह जपले जातात आणि त्यातून घडत जाते विविधतेतील एकता ! अशा आपल्या समृद्ध पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारी ही अनोखी 'जातीची खादाडी!' आपल्या संग्रही हवीच....
Jatichi Khadadi | Mukund kule
जातीची खादाडी | मुकुंद कुळे