Janmsidh Hakk
तमिळ लेखिका वासंती यांची ही लघुकादंबरी स्त्री भ्रूण हत्या या विषयाशी संबंधित आहे. कादंबरीची नायिका मनों ही एक स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. आपल्या लहानशा खेड्यात राहूनच स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय तिने घेतला आहे. कायद्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून तिच्याकडे येणाऱ्या स्त्रियांच्या गर्भात मुलगी असेलतर ती त्यांचे गर्भपात करते. तिला वाटतं की अशा प्रकारे ती स्त्री जातीची सेवाच करते आहे. आपल्या म्हाताऱ्या वडलांसमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडताना एकाचवेळी स्त्रियांना जे भोगावं लागतं त्याविषयी वाटणारी सहानुभूती, स्वतःच्या कृत्यांविषयी वाटणारा तिटकारा यांचं प्रतिबिंब तिच्या स्वत:च्या आयुष्यातही पडलेलं आहे. स्वतःविषयी तिरस्कार वाटत असतानाच घेतलेला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध व्यामिश्र घटीत हा वासंतीच्या मर्मदृष्टी असलेल्या लघुकादंबरीचा विषय आहे आणि लिंगनिरपेक्ष न्याय आणि समतेची बिनतोड मागणी हे बलस्थान आहे.
Janmsidh Hakk : Vasanti, Sunanda Bhosekar
जन्मसिद्ध हक्क : वासंती, सुनंदा भोसेकर