He Shantateche bolane - kashmiri striyancha awaj
गेल्या काही वर्षांत, भारतातील राजकीय घडामोडींच्या पटलावर, काश्मीर हा एक प्रमुख व कळीचा मुद्दा होऊन बसला आहे.
दशकभराहून अधिक काळ चाललेल्या या संघर्षाचा तेथील जनजीवनावर अतिशय गहिरा प्रभाव पडला आहे. उदरनिर्वाहाची साधनं, घरंदारं,
आरोग्य, खाण्यापिण्याच्या सवयी, कार्यालयं, शिक्षण अशा अनेक सामाजिक अंगांच्या अनुषंगाने हा प्रभाव बघता येतो.
त्यातही, महिलांवर झालेला परिणाम हा अजूनच गडद आहे, आणि तरीही काश्मीरसंदर्भातील चर्चांमध्ये त्यांची दखल फारशी घेतली जात नाही,
या संघर्षादरम्यान तेथील महिलांना येत असलेल्या निरनिराळ्या अनुभवांचा मागोवा प्रस्तुत पुस्तकात घेतला आहे.
संघर्षाचा त्यांच्यावर कसा व काय परिणाम होत आहे? न थांबणार्या हिंसाचाराशी त्यांनी कसं जुळवून घेतलं आहे?
आपल्या वाट्याला आलेलं दु:ख व्यक्त करण्याकरता अथवा इतरांबरोबर वाटून घेण्याकरता त्या निरनिराळे मार्ग कशा शोधून काढतात?
महिलांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर संघर्षाचे नक्की काय व कसे परिणाम होत आहेत? कुटुंबव्यवस्था, कुटुंबांतर्गत सत्तासमीकरणं व
एकूणच परस्परसंबंधावर कसे परिणाम होत आहेत? मुलांवर काय परिणाम होत आहेत?
काश्मीरी स्त्रियांच्या मुलाखती, वैयक्तिक अनुभवकथन, विविध अहवाल आणि पुस्तकांतून घेतलेले लेखन अशा विविध मार्गांनी
या समस्येचा धांडोळा या पुस्तकात घेतला गेला आहे. हे सर्व लेखन, संघर्षाच्या एका, कोणाचंच फारसं लक्ष नसलेल्या पैलूकडे लक्ष वेधण्याकडे यशस्वी ठरतं.
ऊर्वशी बुटालिया स्वत: प्रकाशक, लेखिका आणि कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या इतर लेखनात ‘विमेन अँड द हिंदू राईट : अ कलेक्शन ऑफ एसेज’ ( सहसंपादन ),
‘ द अदर साईड ऑफ सायलेन्स : व्हॉइसेस फ्रॉम द पार्टिशन ऑफ इंडिया इत्यादी पुस्तकांचा अंतर्भाव आहे.
हे शांततेचे बोलणे - काश्मिरी स्त्रियांचा आवाज
संपादक – उर्वशी बुटालिया
अनुवाद – बिपीन कार्यकर्ते
He shantateche bolne - kashmiri striyancha awaj
sampadan - urvashi butaliya
anuwad - bipin karyakarte