Good News Ahe ( गुड न्यूज आहे! ) Arthat Matrutwa Upanishad

-20% Good News Ahe ( गुड न्यूज आहे! ) Arthat Matrutwa Upanishad

“गुड न्यूज!’’
“प्रेग्नन्सी कन्फर्म झाली आहे’’ असं डॉक्टरांनी सांगताच,
आजच्या विचारी स्त्रीला आनंद तर होतोच.
पण पुढचे नऊ महिने तिला अनेक कोडी घालत येणार असतात.
आजच्या धावपळीच्या युगात शंका-समाधान करायला डॉक्टरांना वेळच नाही...
अन् पेशंटलाही.
पण वेळोवेळी प्रश्‍न तर पडतातच!
“गर्भारपणी केली जाणारी सोनोग्राफी बाळासाठी सुरक्षित आहे का?’’
“मला गर्भपाताचा धोका तर नाही?’’
“डिलीव्हरी प्रीमॅच्युअर तर होणार नाही?’’
“खाण्या-पिण्यात काय काळजी घ्यायची?’’
“आईकडे जायचंय... प्लेननं जाणं सुरक्षित आहे ना?’’
“व्यायाम करायचे तर कुठले?’’
“सीझरच होतं हल्ली, नॉर्मल डिलीव्हरी करतच नाहीत डॉक्टर.’’
...अनेक शंका-कुशंका.
या दूर करायला
वीस वर्ष अनुभव असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ - जे कादंबरीकारही आहेत -
एका अनोख्या शैलीत थेट - या गर्भवतीबरोबर या पुस्तकात हितगूज करत आहेत.
एका दृष्टीनं हे... जवळ बसून सांगितलेल्या या हिताच्या गोष्टी म्हणजेच... उपनिषद आहे.
आधुनिक वैज्ञानिक मातृत्व उपनिषद!

चार शब्द
मातृत्व व बाळंतपण हे सनातन काळापासून माणसाच्या जीवनाचे व संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.
अवघ्या दोनशे वर्षांपूर्वी येथे दर तीन गर्भार स्त्रियांपैकी एक स्त्री बाळंतपणात मृत्यू पावत होती. त्यामुळे 'बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म' ही कल्पना आजही कुठेतरी प्रत्येकाच्या सुप्त मनात दडलेली आहे.
मात्र गेल्या पन्नास वर्षात काळ कुठून कुठे गेला आहे! तंत्रज्ञान व विज्ञानानं प्रचंड झेप घेतली आहे.
गर्भारपण व बाळंतपण या क्षेत्रातही तंत्रज्ञान व विज्ञानाचं खूप आक्रमण झालेलं आहे.
मोठ्या शहरात बाळंतपण घरी होणं हे जवळपास दिसेनासं होतय. प्रेग्नन्सी आता एक 'मेडिकल इव्हेन्ट'...
'डॉक्टरी बाब' झाली आहे.
तर, तसं उरलं नाही ही वस्तुस्थिती आहे. अनुभवी, जुन्या जाणत्या बायका आता पहिलटकरणीच्या जवळपास नसतात. एकेकटी बायको...
अशा छोट्या परिघात ती स्त्री जेव्हा प्रेग्नन्ट होते, एका खूप काही गोंधळाला आणि चिंतेला जन्म देताना दिसते. खरं पाहता, विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीनं आता बाळंतपण, गर्भारपण खूपच सुरक्षित झालं आहे..!
पण ते तेवढं आनंदी... नैसर्गिक राहिलं आहे का? स्त्री हल्ली करीअर करणारी आहे. ती चार भिंतीत बंदिस्त नाही. जास्त वेळा गर्भारपण आता परवडत नाही. एकच. वा फार तर दोन! साहजिकच आता खूप काही अपेक्षांचं ओझं या गर्भारपणावर, बाळंतपणावर व पर्यायानं स्त्रीरोगतज्ज्ञावर पडू लागलं आहे!

डॉक्टर-पेशंट संवाद आता आक्रसला आहे. वेळ नाही कुणाकडेच. वाढलेल्या अपेक्षा, शंकाकुशंका आणि डॉक्टरांबद्दल निर्माण झालेला अविश्वास या सर्वांमुळे प्रेग्नन्सीचा, गर्भारपणाचा आनंद घुसमटतो आहे..
'सीझर' या तोन अक्षरी शब्दाचं भूत बाळंतपणाच्या मानगुटीवर बसलं आहे! उत्तरं मिळत नाहीत... प्रश्न संपत नाहीत... अशीच अवस्था. ही कोंडी फोडायलाच हे पुस्तक लिहिले जात आहे. गर्भार स्त्री व स्त्रीरोगतज्ज्ञ या दोघांना एकमेकांकडे जे पोचवावंस वाटतं ते पोचवावं, त्या दोघांचा हात एकमेकात गुंफून द्यावा... आणि डॉक्टरांबद्दलचा अविश्वास कमी व्हावा ही इच्छा आहे. कोणताही संवाद हा गैरसमज व चुकीच्या माहितीच्या पायावर घडू शकत नाही. त्यामुळे या पुस्तकाचा मूळ उद्देश, आजच्या सुशिक्षित, समंजस व चौकस स्त्रीला आणि तिच्या नवऱ्याला पुराव्यानं सिद्ध अशी माहिती (Evidence based practices) देणे हा आहे.

हा माहितीचा नकाशा आहे. तो जवळ असेल तर प्रत्येक प्रेग्नन्ट स्त्रीला एक होकायंत्र जवळ मिळेल, ती तिच्या डॉक्टरांना योग्य प्रश्न विचारू शकेल, ती तिच्या डॉक्टरांची बाजू नीट समजावून घेऊ शकेल ही लेखकाची खात्री आहे. म्हणून हे उपनिषद (जवळ बसवून केलेले हितकारक मार्गदर्शन) आहे!!
मातृत्वाबद्दलचं आहे.. म्हणून 'मातृत्व उपनिषद:

सध्या मराठीत गर्भसंस्कारांवर काही पुस्तक उपलब्ध आहेत. माझ्या शास्त्रातील ती नसल्यामुळे ती Evidence based आहेत का नुसती सदिच्छा. हे मी सांगू शकणार नाही. मात्र, एक प्रश्न मला होणाऱ्या प्रत्येक मातेला व पालकांना नक्की विचारायचा आहे.

आपण आपल्या गर्भाबद्दल, बाळाबद्दल काही चुकीच्या, अवास्तव अपेक्षा ठेवत नाही ना?
ज्ञानेश्वर, आइन्स्टाइन हे अपवाद !
चमत्कार!
आपलं मूल असं चमत्कारच असावं असा वेडा अट्टाहास का ? शक्य आहे का ते? अन गर्भारपणीच आपण असा चुकीचा हट्ट करणार असू तर पालक म्हणून आपण कसे वागू? भानावर या. या प्रश्नाचा नीट विचार करा हा माझा मित्रत्वाचा सल्ला आहे.

साहजिकच पुस्तक गर्भसंस्कारा सारख्या पुस्तकाप्रमाणे काही अवास्तव दावा करत नाही. हे पुस्तक एवढच सांगू इच्छित की, जे काही दान आपल्या पदरात दिलंय ते परिपूर्णतेनं लाभाव !
आपल्या बाळाची जी जनुकीय देणगी (Genetic pool ) आहे ती पूर्णत्वान सफल व्हावी. गर्भारपणातले व बाळतपणातले त्रास कमी व्हावेत. त्यातले धोके टाळण्यासाठी सावधानता बाळगता यावी!
हे सर्व शक्य आहे! नक्की शक्य आहे. नवरा बायको जाडीने मिळून ही प्रेग्नन्सी आनंदी करण हे सहज शक्य आहे. ज्ञान हे नेहमीच आनदाचा पाया असते. ते देण्याची ही तळमळीची धडपड लासलगावात २० वर्षप्रवास करत कली. पाच हजाराच्या आसपास बाळतपण करताना जी काही अनुभव झाला तो प्रेग्नन्ट स्त्रीकडे पोचवण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न. सदिच्छा हीच की. प्रत्येक मातेच... प्रत्येक बाळाच... आरोग्य त्यांना त्यांना भरभरून मिळावं!
Good News Aahe : Arun Gadre
गुड न्यूज आहे!
अर्थात मातृत्व उपनिषद
डॉ. अरुण गद्रे

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Arun Gadre

  • No of Pages: 350
  • Date of Publication: 25/12/2019
  • Edition: 4
  • ISBN: 978-81-942479-4-4
  • Availability: 44
  • Rs.350.00
  • Rs.280.00