Ga Ganitacha - Ganitatil Gamati
Click Image for Gallery
अशी एक म्हण आहे की, 'कौशल्ये शिकवता येतात, पण संकल्पना मात्र स्वतःच समजून घ्याव्या लागतात.'
शालेय पुस्तकात दिलेली अनेक उदाहरणे यांत्रिकपणे सोडवून मुलांना संकल्पना समजत नाहीत. त्याऐवजी बुद्धीला चालना देणाऱ्या समस्या, गमतीची कोडी यांसारख्या उपक्रमांतून त्यांचा गणिताचा अभ्यास अधिक चांगला होतो. समस्या सोडविताना त्यांना स्वतः विचार करावा लागतो व त्यातून ते गणित शिकतात. या पुस्तकात गणितज्ज्ञांच्या आयुष्यातील अनेक प्रेरणादायी गोष्टी तर आहेतच शिवाय त्यांनी स्वतः करून पाहण्यासारखे विविध प्रकारचे उपक्रम आहेत, ज्यांच्यामुळे त्यांची गणिताची समज पक्की होईल.
अरविंद गुप्ता
- 1975 साली कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मधून विद्युत अभियांत्रिकीची पदवी.
- विज्ञानविषयक उपक्रमांचे दूरदर्शनवर 125 कार्यक्रम प्रसारित.
- "Matchstick Models & Other Science Experiments" ह्या पहिल्या पुस्तकाचे 12 भारतीय भाषांत अनुवाद आणि या पुस्तकांची 5 लाखांहून अधिक प्रर्तीची विक्री.
arvindguptatoys.com या संकेतस्थळावर अनेक दर्जेदार पुस्तके, विज्ञानखेळणी बनवण्यासाठी मार्गदर्शन करणारे हजारो फोटोज व शेकडो फिल्म्स उपलब्ध.
पुणे विद्यापीठातील 'आयुका'त मुलांसाठी असलेल्या विज्ञान केंद्रात 2003 पासून कार्यरत.
Ga Ganitacha - Ganitatil Gamati : Arvind Gupta, Sujata Godbole
ग गणिताचा - गणितातील गमती : अरविंद गुप्ता, सुजाता गोडबोले