Barking up the Wrong Tree
यश मिळवण्याविषयी आपल्याला सामान्यपणे जो जो सल्ला दिला जातो, तो तर्कशुद्ध
असतो... गंभीर असतो; पण पूर्णपणे चुकीचा
असतो.
‘बार्किंग अप द राँग ट्री’ या पुस्तकात एरिक बार्कर यशप्राप्ती नेमकी कशाने साध्य होते यामागचं असामान्य शास्त्र
सांगतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कुणालाही ती कशी साधता येते, हे ते सांगतात.
* तुम्ही या पुस्तकात शिकाल की, वर्गातली अभ्यासात हुशार असणारी मुलं कमी वेळा करोडपती झालेली
पाहायला का मिळतात आणि तुमचा सगळ्यात मोठा कमकुवतपणा तुमची सर्वात मोठी ताकद कशी ठरू
शकते.
* चांगली मुलं नेहमी मागे का राहतात आणि सहकार्याने काम करण्याचे
धडे नेहमी गुंडांच्या टोळ्या, डाकू आणि
अट्टल खुनी यांच्याकडून का मिळतात.
* आत्मविश्वास वाढवायचे
प्रयत्न का फसतात आणि बौद्ध तत्त्वज्ञान उत्तम अशी समस्यानिवारणाची पद्धत कशी सांगते.
* आरमाराचा अभेद्य शिक्का बनवायचा जादूई घटक असणारी विशेष वाळू, जी अरिष्ट आल्यावरही सुरक्षित राहणार्या लोकांना तारण्यासाठी तरफेचे काम करते.
* व्यवसाय, नोकरी आणि
खासगी आयुष्य यातला समतोल राखण्यासाठी - जेंघिस खानची धोरणं, अल्बर्ट
आइनस्टाइनच्या चुका आणि स्पायडर-मॅनकडून
मिळालेले छोटे छोटे धडे.
* असामान्य पद्धतीने यशस्वी झालेल्या लोकांना आपल्या सर्वांपासून
वेगळं करणारं नेमकं काय असतं? आपण काय
केलं असता त्यांच्यासारखे होऊ? आणि अशीही
काही उदाहरणं, जसे आपण सुदैवाने नाही आहोत - ‘बार्किंग अप द राँग ट्री’.
* या पुस्तकाने मांडलेली आश्चर्यचकित करणारी सांख्यिकी माहिती आणि बुचकळ्यात टाकणारी विधानं - तुम्हाला काय उपयुक्त ठरतं आणि काय नाही हे समजायला मदत करते. त्यामुळे तुम्ही यशस्वितेसाठी काय करायचं याचा अंदाज करणं थांबवता
आणि तुम्हाला हवं तसं आयुष्य जगायला सुरुवात करता.