Bakhar Sanganakachi

-20% Bakhar Sanganakachi

संगणक या यंत्राची कल्पना बरीच जुनी आहे. नेपियर आणि पास्कल यांच्यासारख्या गणितज्ञांच्या काळापासून सुरू झालेला संगणकाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे. या काळात संगणकाची संकल्पना, त्याचा आकार, त्याच्याशी संबंधित असलेलं सॉफ्टवेअर यात आमूलाग्र बदल झाले आहेत. सुरुवातीच्या यांत्रिकी तत्त्वांवर आधारित असलेल्या संगणकांचं रूप विजेवर चालणार्या संगणकीय युगानं बदलून टाकलं. त्यानंतर ट्रान्झिस्टर आणि आयसी यांच्या शोधांमुळे तर संगणक पारच बदलले. छोट्या आकाराचे आणि खूप जास्त क्षमतेचे संगणक तयार झाले. आता तर अनेक जणांच्या मनगटावर छोटा संगणकस्मार्ट वॉचच्या रूपानं दिसतो!

 

संगणकाचा हा प्रवास अक्षरश: थक्क करून सोडणारा आहे.

या अद्भुत आणि रंजक वाटचालीचे असंख्य शिलेदार आहेत. त्यांच्या अविस्मरणीय आणि काही वेळा अविश्वसनीय कहाण्या आहेत. या तंत्रज्ञांचा प्रवास समजून घेणंसुद्धा अत्यंत मनोवेधक आहे.

 

अत्यंत सोप्या भाषेत आणि रंजक शैलीत हा सगळा प्रवास ओघवत्या पद्धतीनं मांडणारं मराठीमधलं हे एकमेव पुस्तक आहे.

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Achyut Godbole, Atul Kahate

  • No of Pages: 332
  • Date of Publication: 25/12/2018
  • Edition: First
  • ISBN: 978-93-87667-60-0
  • Availability: 35
  • Rs.300.00
  • Rs.240.00