Anartha

-20% Anartha

‘अनर्थ’च्या या पहिल्या भागाचे चार भाग केले आहेत. पहिल्या भागात जीडीपी म्हणजे काय आणि पर्यावरणांचा र्‍हास, विषमता, बेरोजगारी अशा गोष्टींचा विचार न करता फक्त जीडीपीवाढीमागे सुसाट धावणं म्हणजेच जीडीपीझम कसा घातक आहे आणि आजच्या नवउदारमतवादी अर्थव्यवस्थेत त्याशिवाय कसा पर्याय नाही आणि त्यामुळे आपण कसे विनाशाकडे चाललो आहोत हे सांगितलं आहे. याचा अर्थ जीडीपीवाढ वाईटच आहे असं नाही. ती वाढ पाहिजेच. निदान काही काळ तरी पाहिजेच. नाहीतर सरकारला खर्च करण्यासाठी कर कसे वाढतील? पण या जीडीपीवाढीच्या मंत्राचा आज अतिरेक होतोय, ती वाढ एकांगी होतेय, त्यामध्ये विषमता आणि बेरोजगारी वाढते आहे आणि त्याच्या पर्यावरणीय किंमतीचा विचार आपण करत नाही आहोत हा मुद्दा आहे. त्यानंतरच्या प्रकरणात चंगळवाद म्हणजे काय? हे सांगून त्याचा इतिहास सांगितला आहे. याच भागाच्या सुरुवातीला भारताच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर ‘आजचा भारत’ हा एक प्रदीर्घ लेख आहे. दुसर्‍या भागात हवामानबदल (क्लायमेट चेंज) याविषयी विस्तृत स्वरुपात चर्चा आहे. त्याचं विज्ञान, त्याचे परिणाम, त्यामागचं अर्थकारण, राजकारण आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या आणि बाजारपेठी पद्धती निदान आत्तापर्यंत कशा अपयशी ठरल्या आहेत हेही (ग्रीन कॅपिटॅलिझम) या प्रकरणातसांगितलं आहे. अतुल देऊळगावकरच्या ‘विश्‍वाचे आर्त’ या पुस्तकाचा या भागासाठी उपयोग झाला. ते पुस्तक प्रत्येकानं जरूर वाचावं. तिसर्‍या भागात चंगळवादाच्या वेगवेगळ्या आविष्कारांविषयी आकडेवारीसकट भाष्य केलं आहे. यात आपण रोज वापरणार्‍या काच, कापड, कागद, प्लॉस्टिक अशा वस्तू आणि निर्माण होणारा कचरा आणि पर्यावरणाचा र्‍हासयांचा संबंध दाखवला आहे. हे लिहिताना ‘दी स्टोरी ऑफ स्टफ’ आणि ‘दी सिक्रेट लाईफ ऑफ स्टफ’ या पुस्तकांचा खूपच फायदा झाला. याशिवाय याच भागात शीतपेयं, फास्ट फूड, मोटारगाड्या, सौदर्यप्रसाधनं, कचरा, ई-वेस्ट अशी अनेक प्रकरणं आहेत. यातल्या कचर्‍याविषयी लिहिताना ‘वेस्ट ऑफ ए नेशन’ या पुस्तकाची मदत झाली. चौथा भाग समारोपाचा आहे. अनेक वर्षांपूर्वी मी ‘थैमान चंगळवादाचे’ अशी एक पुस्तिका लिहिली होती. त्यातला काही भाग यात घेतला आहे आणि बराच नवीनही घातला आहे. आजच्या चंगळवादी संस्कृतीचे आणि समाजव्यवस्थेचे मनस्वास्थ्यावर कसे परिणाम होतात याविषयी यात विवेचन आहे. ऑलिव्हर जेम्सचं ‘अ‍ॅफ्ल्यूएन्झा’ आणि इतर काही पुस्तकं यांची यासाठी खूप मदत झाली.
अर्थात यावर उपाय काय हा प्रश्‍न यातून सहाजिकच विचारला जाईल. ते ‘अनर्थ’च्या पुढच्या भागात येईलच. पण एक गोष्ट नक्की, की आजची विकासनीती ही फक्त वरच्या 10% ते 15% लोकांसाठी, त्यांनीच चालवलेली, प्रचंड यांत्रिकीकरण आणि रोबोट्स वापरून पर्यावरणाचा र्‍हास करणारी, बेरोजगारी वाढवणारी, उत्पादन आणि अर्थव्यवस्था यांचं केंद्रीकरण करून शहरांचं बकालीकरण करणारी आणि सर्वत्र असुरक्षितता आणि विषमता निर्माण करून शारीरिक आणि मानसिक विकार वाढवणारी अशी आहे. ती बदलली पाहिजे यात शंकाच नाही. मग या नव्या मॉडेलमध्ये गांधीजीही असतील, केन्सही असेल आणि मार्क्सही असेल!

Anartha : Achyut Godbole
अनर्थ : अच्युत गोडबोले

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Achyut Godbole

  • No of Pages: 444
  • ISBN: 978-93-87667-93-8
  • Availability: 50
  • Rs.320.00
  • Rs.256.00