Aanandi Vivahik Jivan
आई- वडिलाकडून, शिक्षकांकडून तरुण मुला-मुलीना लैंगिक जीवनाबद्दल काहींच माहिती मिळत नाही.
तरुण मुला-मुलींना लैंगिक शिक्षण मिळते ते सिनेमा, टीव्ही आणि रस्त्यावरील पुस्तके यातून.
नपुसकत्व, पहिल्या रात्रीचे गैरसमज, शीघ्रपतन, स्वप्नावस्था, हस्तमैथुन, सेक्स टॉनिक आदी विषयांवर लोक उघडपण बोलत नाहीत. वयात आल्यानंतर निसर्ग स्वस्थ बसू देत नाही. कामजीवनाची माहिती चोरून लपवून मिळण्याऐवजी ह्या पुस्तकातून मिळवली तर बरेच गैरसमज टाळता येतील. स्त्री उच्चशिक्षित झाल्यामुळे आणि स्त्रियांकरिता असलेल्या आरक्षणामुळे स्त्रिया समाजकारण आणि राजकारणात पुरषांच्या बरोबरीने भाग घेत आहेत. स्त्रियांचं व्यक्तिमत्त्व झपाट्याने बदलत आहे. स्त्रीच्या बदललेल्या व्यक्तिमत्वाला आणि बदलत्या मानसिकतेला स्वीकारणे पुरुषाला कठीण जात आहे. हयामुळे दोघांच्याही संबंधामध्ये ताणतणाव निर्माण होतो. ह्या पुस्तकामुळे पति-पत्नीचे संबंध निश्चितच सुधारतील आणि वैवाहिक जीवन आनंदी होण्यास मदत होईल ही खात्री आहे.
Aanandi Vivahik Jivan : Dr.Deepak Kelkar
आनंदी वैवाहिक जीवन : डॉ.दीपक केळकर
Anandi Vivahik Jeevan