Vivekiyanchi Sangati

-20% Vivekiyanchi Sangati

केवळ स्वत:साठीच स्वत: पुरतेच जगणे हे प्राणीपातळीवरचे आहे असे मानणा-या जात, धर्म, वर्ग, लिंग या सर्व भेदांच्या पलीकडे जाणारा सुसंस्कृत विवेकी समाज घडविण्यासाठी आयुष्य वेचलेल्या धुरिणांविषयीची कृतज्ञता लेखक अतुल देऊळगावकर यांनी आपल्याविवेकीयांची संगतीया पुस्तकामधून व्यक्त केली आहे. या पुस्तकात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, कृषीतज्ज डॉ. नॉर्मन बोरलॉग, सत्यजित राय, मृणाल सेन, लॉरी बेकर, कुमार गंधर्व, व्यंगचित्रकार केशव आणि सुरेंद्र, डॉ. सुधीर कक्कर, कुमार केतकर, प्रा. भागवतराव धोंडे, जयंत वैद्य यांसारख्या व्यक्तींवरील लेखांचा समावेश आहे.

विसाव्या शतकाने दोन महायुद्धं, महामंदी, दुष्काळ, भूकबळी यांचा भीषण अनुभव घेतला.
आपल्या सभोवतालची परिस्थिती बदलण्यासाठी शर्थीचेप्रयत्न झाले. ‘केवळ स्वत:साठीच स्वत:पुरतेच जगणे,
हे प्राणीपातळीवरचे आहे.’ असा समज दृढ असणार्‍या त्या काळात जात, धर्म, वर्ग लिंग हे भेदाभेद अमंगळ
मानणारे अनेकजण होते. सर्व प्रकारची कुरूपता नष्ट करण्याचं ध्येय घेऊन, सर्व भेदांच्या पलिकडे जाणारा
सुसंस्कृत विवेकी समाज घडवण्याची उमेद असणारे,ते वातावरण होते. त्या काळातवो सुबह कभी तो
आएगीही आशा त्यामुळेच होती.
कित्येक शिक्षक, साहित्यिक, कलावंत, वैज्ञानिक,डॉक्टर, इंजिनिअर हे भवताल बदलण्याकरिता झटत होते.
ह्या व्यक्तींच्या प्रभावामुळे खेड्यापासून जागतिकपातळीपर्यंत अनेक संस्था निघाल्या आणि त्यांच्या
सभोवतीचे क्षेत्र उजळून निघाले.
 
आता मात्र विचारांचा लंबकमी आणि मीचह्याटोकाला जाऊन बसला आहे. विसंवाद सुद्धा होणारी
असंवादी अवस्था दिसत आहे. नाती तुटत चाललीआहेत. संवेदनशीलता दुर्लभ झाली आहे. पावलोपावली
मूल्य र्‍हासाच्या खुणा दिसत आहेत. व्यक्ती आणि नातीयांच्या वस्तुकरणाचा काळ अनुभवास

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Atul Deulgaonkar

  • No of Pages: 208
  • Date of Publication: 18 may 2019
  • Edition: 1st
  • ISBN: 978-93-87667-92-1
  • Availability: In Stock
  • Rs.250.00
  • Rs.200.00