Sir Vishweshwrayya

-20% Sir Vishweshwrayya

अभियांत्रिकी क्षेत्रात डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या हे

उत्तुंग पर्वतशिखराएवढे उंच होते, अशी इतिहासाने नोंद करून ठेवली आहे. इतिहास असेही म्हणतो, की एखाद्या व्यक्तीची महानता ही त्याने किती संपत्ती कमावली किंवा किती मोठी सत्ता उपभोगली यांवर ठरत नाही. त्या व्यक्तीने मानवाच्या हितासाठी प्रगतीसाठी काय योगदान दिले यावर ती ठरते; आणि ह्या कसोटीवर तपासून पाहायचे ठरवले, तर विश्वेश्वरय्या अधिकच उंच भासू लागतात. ते एक महान अभियंता होते, एक उत्तम प्रशासक होते, एक उद्योगपती होते, एक शिक्षणतज्ज्ञ होते, एक अर्थतज्ज्ञ होते, एक समाजसेवक क्रीडाप्रेमी होते,

एक लेखक होते, एकद्रष्टे महापुरुषहोते. उत्तुंग अशी स्वप्ने पाहून ती सत्यात उतरवणारेस्थितप्रज्ञहोते. ‘सक्तीचे प्राथमिक शिक्षण आणि गरिबांना पददलितांना मोफत शिक्षणहे धोरण भारतात प्रथम त्यांनी आणले. मोठे उद्योग, त्यासाठी पैसा हवा म्हणून आपली स्वत:ची (राज्याची) बँक, कुशल मनुष्यबळ लागेल म्हणून शिक्षण तंत्रशिक्षण संस्था, ग्रामीण कृषिप्रधान

जीवन सुखी व्हावे म्हणून शेतकी शाळा कॉलेज, शिक्षण आपल्या गरजेनुसार देता यावे म्हणूनआपलेविद्यापीठ; असे एक ना अनेक उपक्रम त्यांनी राबवले. पायाभूत सुविधा विकसित केल्या. राष्ट्राच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना ही कल्पना लिखित स्वरूपात मांडली.

म्हणून ते काळाच्या पुढे पाहणारे विचारवंत! द्रष्टे! द्रष्टा एम. व्ही.!

अशा व्यक्तीची ओळख करून घेणे म्हणजे जगण्यासाठी नवी ऊर्जा मिळवणे! सतत कठोर

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Mukund Dharashivkar

  • No of Pages: 404
  • Date of Publication: 21/01/2018
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-86118-79-0
  • Availability: In Stock
  • Rs.450.00
  • Rs.360.00