Tumche-Aamche Superhero- J.K.Rowling
‘हॅरी पॉटर’ या
पुस्तक मालिकेमुळे
जे. के. रोलिंग ही
ब्रिटिश लेखिका
जगभरातल्या वाचकांमध्ये
लोकप्रिय झाली.
त्या मालिकेतून
एक लेखिका म्हणून
जे. के. रोलिंगची अनेक
वैशिष्ट्ये दिसतात.
तिची अफाट
कल्पनाशक्ती, जागोजागी व्यक्त
होणारा
तिरकस ‘ब्रिटिश ह्युमर’,
प्रचंड वाचन आणि
त्याची कथेतल्या
पात्रांशी घातलेली सांगड,
गोष्ट सांगायची
हातोटी आणि ती गोष्ट
प्रभावीपणे मांडायची
बुद्धीमत्ता हे सर्वच गुण
जे. के. रोलिंगच्या लेखनात
आहेत.
‘हॅरी पॉटर’च्या
कथेने लहान मुलांना
परत एकदा
पुस्तकांच्या वाचनाकडे खेचून
आणलं.
या पुस्तक
मालिकेने आणि त्यावर आधारित
चित्रपटांनी विक्रीचे
आणि उत्पन्नाचे अनेक
विक्रम रचले.
‘हॅरी पॉटर’मुळे
जे.
के.
रोलिंग एक
‘सेलेब्रिटी लेखिका’ झाली. बालपणापासून
जे. के. रोलिंगला लेखिकाच
व्हायचं होतं
आणि तिचं
ते स्वप्न तिने यशस्वीपणे
प्रत्यक्षातही आणलं.
ती हाडाची
लेखिका आहे. ती स्वत:ला
आजही एक
‘साधीसुधी लेखिका’ असंच
म्हणवून घेते.
‘हॅरी पॉटर’च्या
मालिकेनंतरही तिचं लेखन चालू
आहे.
अमाप यश, प्रचंड
संपत्ती, अचाट प्रसिद्धी
मिळालेली असूनही
जे.
के.
रोलिंगचे पाय
जमिनीवरच आहेत. म्हणूनच
जे.
के.
रोलिंगही
तुमची-आमची ‘सुपरहीरो’ आहे.