Amazon

-20% Amazon

पुस्तक, पुस्तकांची निर्मिती आणि पुस्तकांची खरेदी या सगळ्या गोष्टींच्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या संकल्पना फक्त 15 वर्षांच्या काळात पूर्णपणे बदलून टाकायची किमया जेफ बेझॉस या माणसानं करून दाखवली आहे. त्यानं सुरू केलेल्या ‘अ‍ॅमॅझॉन डॉट कॉम’ या वेब साईटनं आधी पुस्तकांचं वितरण, पुस्तकांची खरेदी या गोष्टींच्या संदर्भात प्रचंड धुमाकूळ घातला. आता तर अ‍ॅमॅझॉनवर जवळपास कुठलीही वस्तू उपलब्ध असते. यामुळे अ‍ॅमॅझॉन हे अख्ख्या जगाचंच दुकान बनलं आहे. आता तर छापील पुस्तक, छापील वर्तमानपत्र, छापील नियतकालिक या गोष्टी इतिहासजमा करून या सगळ्यांच्या इलेक्ट्रॉनिक म्हणजे डिजिटल आवृत्त्याच भविष्यात बघायला मिळतील, असं चित्र बेझॉसनं निर्माण केलं आहे. गटेनबर्गच्या छपाईयंत्राच्या शोधानंतर शब्दांचं भवितव्य एकहाती बदलून टाकणारा माणूस म्हणून आपण बेझॉसचं आणि त्याच्या ‘अ‍ॅमॅझॉन डॉट कॉम’चं वर्णन करू शकतो!

अ‍ॅमॅझॉनच्या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्‍न असतात :
* पुस्तकांच्या विक्रीमध्ये इतकं यश मिळवण्यामागचं रहस्य काय असू शकतं?
* पुस्तकांचं रंगरूप पूर्णपणे बदलून टाकण्याजोगं अ‍ॅमॅझॉननं नक्की काय केलं आहे?
* अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत अ‍ॅमॅझॉनचं वादळ पोहोचेल का आणि कसं?

या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं देणारं, अ‍ॅमॅझॉनच्या प्रवासाचा आलेख रेखाटणारं आणि अ‍ॅमॅझॉनची सक्सेस स्टोरी सांगणारं हे पुस्तक आहे.

Amazon : Atul Kahate
अमॅझाॅन :अतुल कहाते

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Atul Kahate

  • No of Pages: 112
  • Date of Publication: 2017-11-01
  • Edition: 6
  • ISBN: 978-93-86118-95-0
  • Availability: 99
  • Rs.130.00
  • Rs.104.00