Tumche-Amche SuperHero- Dr. Prakash Aamte

-20% Tumche-Amche SuperHero- Dr. Prakash Aamte

जिथे रस्ते नव्हते, वीज नव्हती, एवढंच काय, पण रोजच्या जगण्यासाठी लागणार्या साध्या सुविधाही नव्हत्या, अशा हेमलकशासारख्या अतिशय दुर्गम आदिवासी भागात जाण्याचा निर्णय डॉ. प्रकाश आमटे यांनी आपल्या वडिलांना - बाबा आमटे यांना - दिलेल्या शब्दाखातर, आयुष्याचं ध्येय म्हणून घेतला. हेमलकशाच्या आजूबाजूला असलेलं जंगल, जंगलातले विंचू, साप, अस्वल आणि जंगली प्राणी, आदिवासींचं भीषण दारिद्य्र आणि कुपोषण, भाषेचे प्रश् अशा अनेक अडचणींची मालिकाच डॉ. प्रकाश आमटे यांच्यापुढे होती. तरीही ही दुर्गम वाट स्वीकारत पुढे जाणार्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या अथक प्रयत्नांमधून आज हेमलकशात शाळा सुरू झाली, हॉस्पिटल उभारलं गेलं, शेती पिकू लागली आणि जे हेमलकसा जगापासून तुटलं होतं, ते आज जगाच्या नकाशावर ठळकपणे आपली ओळख दाखवू लागलं आहे. डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याची दखल राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आणि त्यांच्यावरमॅगसेसेसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा वर्षाव झाला. मानवतेचा ध्यास घेतलेले डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांना प्रत्येक पावलावर साथ देणार्या डॉ. मंदा आमटे यांनी हेमलकशातले आदिवासी आणि तिथले वन्य प्राणी यांच्या आयुष्यात नंदनवन फुलवलं. म्हणूनच तर ते ठरतात सर्वार्थानंतुमचे आमचे सुपरहिरो!’

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Deepa Deshmukh

  • No of Pages: 46
  • Date of Publication: 2016-09-15
  • Edition: 4
  • ISBN: 978-93-86118-15-8
  • Availability: 47
  • Rs.85.00
  • Rs.68.00