Vishtha

-20% Vishtha

विष्ठा म्हटलं की ओंगळ, दुर्गंधी असलेलं, नकोसं वाटणारं, त्रासदाकही होणारं, असं काहीतरी, असं वाटणं साहजिक आहे. पण हा पदार्थही उपुक्त असू शकतो, हे या पुस्तकाच मनोरंजक विश्लेषणातून जेव्हा समोर येतं, तेव्हा चकीतच व्हायला होतं. आपला दृष्टीकोनच बदलाला हवा आणि वेगळ्याच प्रकारे विज्ञानाचा अभ्यास आपण कराला हवा, हे लख्खपणे समोर येतं.

शेण, लेंड्या, कोंबडीची विष्ठा हे तर मानवाला अत्यंत उपयुक्त आणि रोजच्या जीवनाशी निगडित असणारे पदार्थ आहेत. काहींच्या विष्ठेपासून कागद तयार होतो, एवढेच नाही तर काही प्राण्यांची, पक्ष्यांची विष्ठा ही सौंर्दप्रसाधने, सुवासिक अत्तराप्रमाणे आपल रोजच्या वापरात आहेत, हे जाणून तर मजाच वाटते.

विष्ठेचे विविध प्रकार, त्याची तपासणी आणि त्यातून काय कळते हे जेवढे रंजक तेवढेच महत्त्वाचे. विज्ञान विषयातील या वेगळ्या विषयाकडे सजगपणे पाहणारे, पण कोठेही ओंगळ होऊ न देता लिहिलेले, कोणासही आवडावे असे, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना तर एखाद्या संदर्भ  ग्रंथाप्रमाणे जरूर संग्रही ठेवण्यासारखे आणि थोडक्यात महत्त्वाचे असे, अतिशय साधेपणाने सांगणारे हे पुस्तक सर्वांनाच उपुक्त ठरावे.

Vishtha | Anand Ghaisas

विष्ठा | आनंद घैसास

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Anand Ghaisas

  • No of Pages: 32
  • Date of Publication: 25/10/2022
  • Edition: First
  • ISBN: 978-93
  • Availability: 46
  • Rs.99.00
  • Rs.79.20