Badalta Bharat - Paratantryatun mahasattekade

New -40% Badalta Bharat - Paratantryatun mahasattekade
प्रकाशनपूर्व सवलत मिळवण्याची  सुवर्ण संधी आता १५ मार्च २०२३ पर्यंत 

भारताचे बहुरूपदर्शक आणि समग्र चित्र रेखाटणारा संदर्भग्रंथ !
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षे. असे स्वातंत्र्य आहे की जे जगात सर्वाधिक वर्चस्वशाली असणार्‍या ब्रिटिश सत्तेविरुध्द इथल्या कोट्यवधी जनतेने अथक संघर्ष करून मिळवले. 
जगाच्या इतिहासातील एक महान मुक्तिपर्व. एक असा गौरवशाली स्वातंत्र्यसंग्राम की ज्याने आधुनिक भारताला जन्म  दिला आणि जगाच्या इतिहासावर आपली छाप उमटवलअसा इतिहास की ज्याने प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीची मान आजही उंचावते.  असे स्त्रीपुरुष 'नायक', नेते, समाजधुरीण, क्रान्तिकारक आणि महामानव की त्यांच्याविषयी
आजही देशभर अपार आदर, प्रेम आणि अद्भुत आकर्षणही आहे.  दोन शतकांचे विविध जनसमुदायांचे असे संघर्ष की ज्यांना अभिवादन केल्याशिवाय कोणीही भारतीय आजही पुढे जाऊ शकत नाही. 
या साऱ्याला मनोविकास प्रकाशन अभिवादन करत आहे  'बदलता भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे... ' या आपल्या महाग्रंथाद्वारे! 
असा ग्रंथ की जो  स्वातंत्र्य संग्रामाचा व स्वातंत्र्योत्तर देश उभारणीचा अनोख्या पद्धतीने अगदी मुळापासून वेध घेतो. असा ग्रंथ की ज्याच्या दोन खंडातील आठ विभागात गुंफलेले साठ लेख आपल्याशी  बोलतात -
 या सार्‍या गुंतागुंतीच्या आणि रोमांचकारी इतिहासावर.  ते उकलतात  या देशाचे असे अंतरंग की जे जितके विलोभनीय आहे तितकेच विषण्ण करणारेही आहे.
 विविध नामवंत लेखकांनी स्वतंत्र दृष्टिकोनांमधून आणि आपापल्या परिप्रेक्ष्यांतून भारतीय जीवनाच्या विविध क्षेत्रांचे आणि पैलूंचे केलेले परखड विश्लेषण! 
ज्यातून आपल्या समोर येतो भारताच्या भविष्याची निश्चित अशी दिशा उलगडणारा महाग्रंथ!! 
भारताचे  विविधांगी, बहुरूपदर्शक [कॅलिडस्कोपिक] आणि तरीही समग्र चित्र समोर ठेवणारा असा हा महाग्रंथ प्रत्येक देशप्रेमीने आवर्जून वाचलाच पाहिजे !!!

नामवंतांचा सहभाग 
अविनाश पांडे । रेणुका ओझरकर : भाषा, श्रद्धा कुंभोजकर – महाकाव्ये,  जास्वंदी वांबुरकर : इतिहासलेखन, हेमंत राजोपाध्ये : आर्यवाद,  गोपाळ गुरु : स्वातंत्र्य , गणेश देवी : भारतीयत्व
प्राची देशपांडे : शिवाजी, दत्तप्रसाद दाभोळकर : विवेकानंद,  रवी आमले : सुभाषचंद्र बोस, श्याम पाखरे  : द्विराष्ट्रवाद, किशोर बेडकीहाळ : धर्मनिरपेक्षता, इरफान इंजिनीयर : धर्मांध दंगली, रावसाहेब कसबे : बौध्द धर्म
अरविंद गणाचारी : १८५७ चा उठाव, एस पी शुक्ला : देशविधात्या घडामोडी, सरफराज अहमद : मुस्लिमांचा राष्ट्रवाद,  अशोक चौसाळकर : साम्यवादी चळवळ ,संजय मं गो  : लोकशाही समाजवाद, बशारत अहमद  : स्वातंत्र्यलढ्यात मुस्लीम,  सचिन गरुड : विद्रोही परंपरा
उध्दव कांबळे : कायदे आणि संविधान, सुहास पळशीकर : भारतीय लोकशाही, जयंत लेले : संघराज्य,  गायत्री लेले : पूर्वोत्तर भारत, अनंत बागाईतकर : सुरक्षा यंत्रणा, विजय खरे : लष्कर, प्रताप आसबे : कश्मीर, परिमल माया सुधाकर : भारत-चीन
तारा भवाळकर : लोकसंस्कृती, शांता गोखले :  बहुसांस्कृतिकता, अशोक राणे : हिंदी चित्रपटसृष्टी, रणधीर शिंदे : मराठी कविता, सूर्यनारायण रणसुभे : हिंदी साहित्य, नुपूर देसाई : दृककला, मकरंद साठे : मराठी रंगभूमी, दीपक घारे : शिल्पकला, नीला भागवत : संगीत 
डी रघुनंदन : विज्ञान-तंत्रज्ञान, डॉ. हेमचंद्र प्रधान : शालेय शिक्षण, श्रीरंजन आवटे : संस्थात्मक उभारणी, मिलिंद वाघ : उच्च शिक्षण, अनंत फडके : आरोग्य, पराग फाटक : क्रीडा, अभिषेक भोसले : वृत्तपत्रे प्रसारमाध्यमे
शमा दलवाई : अर्थकारण,  पराग चोळकर : हिंद स्वराज्य, के. जे. जॉय : पर्यावरण,  प्रदीप पुरंदरे : पाणी, जयदीप हर्डीकर : शेती, गजानन खातू : सहकार चळवळ, संजीव चांदोरकर : सार्वजनिक क्षेत्र, सचिन रोहेकर : खाजगी उद्योग
 संध्या नरे-पवार : स्त्री आणि  राजकारण, आनंद करंदीकर : परदेशस्थ भारतीय, नारायण भोसले : भटके विमुक्त, देवकुमार आहिरे : आदिवासी, अजित अभ्यंकर : कामगार,  शैलेंद्र खरात : जातिगत इतिहास, दिलीप चव्हाण देवेंद्र इंगळे : जातिगत राष्ट्रवाद, माया पंडित : स्त्री आणि समाज

प्रत्येक देशप्रेमीने आवर्जून वाचलाच पाहिजे असा ग्रंथ !

प्रकाशनपूर्व सवलत योजना
बदलता भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे...
ग्रंथाचा आकार । ७.२५ x  ९.५० इंच । पुठ्ठा बांधणी
पृष्ठ संख्या : १२०० ।  दोन खंड । मूल्य : ३००० रु
 
सवलत मूल्य : १८०० + पोस्टेज १३०
 
बदललेला नोंदणी  कालावधी –  १५ मार्च २०२३ 
उपलब्ध - २३ मार्च २०२३ 
 
बदलता भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे / Badalta Bharat - Paratantryatun mahasattekade 
Datta Desai - दत्ता देसाई 

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Datta Desai

  • No of Pages: 1200
  • Date of Publication: 15-03-2023
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-91547-56-
  • Availability: In Stock
Discount Ends On:
  • Rs.3,000.00
  • Rs.1,800.00