Surya Girnari Mi - Eka Karyakarticha Atmakathan

-20% Surya Girnari Mi - Eka Karyakarticha Atmakathan

सूर्य गिळणारी मी

एका कार्यकर्तीचं आत्मकथन

लग्न ही स्त्रीला एवढं आमूलाग्र बदलवणारी घटना असतेजर ती दोन जिवांची एकरूपता असेलतर तिच्या सगळ्या अस्तित्वासह का नाही नवरा तिला स्वीकारतका तिलाच तिच्यातून बरंच काही वजा करावं लागतंमी माझ्या 'स्वलाच वजा करायचंनाही. बस झालं आता. मला जगायचं आहे. मला जगायचंच आहे. मला माझं स्वातंत्र्य हवं आहे . अगदी शेवटचे काही महिने माझी सर्व गात्रं बधिर झाली होती. दुःखआनंद याच्यापलीकडे  माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहेयाची मला पूर्णपणे जाणीव झाली होती. स्वप्नहीनभविष्यहीनभावनाविरहीत निर्जीव अशी होऊन गेले होते मी. ही अशी अरुणा तर माझ्या ओळखीचीच नव्हती. ओठांतून रक्त आले तरी वेदना होत नव्हत्या. कित्येक दिवस उपाशी ठेवले तरी मला भूक लागत नव्हती. ओठ आणि जीभ जखमी असताना जबरदस्तीने मला गरम चहा प्यायला लावला तरी वेदना होत नव्हत्या,  की त्या मी माझ्या मनाला जाणवूच देत नव्हतेमी बधिर झाले होते हेच खरे! ज्या क्षणी मला असं वाटलं आता आपण इथे वाचू शकत नाही त्या क्षणी एका सकाळी मी माझ्या अंगावरच्या वस्त्रांनीशी घर सोडलं लपतछपत गल्लीबोळांतून जात होते. रस्त्यात एक टेलिफोन बुथ दिसला. थकलेल्या मेंदूला काहीतरी जाणीव झाली. बहिणीला फोन लागला. तिथून जवळच असलेल्या मोठ्या ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्यात मी जाऊन बसले. तिथे घ्यायला माझा भाचा आशू आला;   मला भिकारीण  समजून  तो माझ्या समोरून मलाच शोधत पुढे निघून गेला. अशा अत्यंत दाहक अनुभवातून तावून सुलाखून निघालेला एक जीवन प्रवास! वाचायलाच हवं असं एका कार्यकर्तीचं प्रेरणादायी आत्मकथन!!

Surya Girnari Mi - Aruna Sabane

सूर्य गिळणारी मी - अरुणा सबाने

अरूना 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Aruna Sabane

  • No of Pages: 496
  • Date of Publication: 08/03/2022
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-91547-58-5
  • Availability: In Stock
  • Rs.600.00
  • Rs.480.00