Bazar – Mulyahin Arthawyawaharanchan Mukta Chintan

-20% Bazar – Mulyahin Arthawyawaharanchan Mukta Chintan

हे शतक उजाडताना मात्र सॅम्युएल्सन असंबद्ध वाटू लागला. सेन्सेक्स-निफ्टी, GDP-GNP वेगवेगळे महागाई निर्देशांक

वगैरे समजून घ्यायला गेलं की फारदा निष्कारण तपशिलानं मुद्दे धूसर केले जात आहेत, दडवले जात आहेत,

obfuscate केले जाताहेत, असं वाटायचं. मग फापटपसारा हटवणारी रासवट-मराठी cut the crap वृत्ती वापरून

आकलन सोपं करायला धडपडू लागलो. थोडं जमायचं, खूपसं सुटून जायचं. अशातच 2008 ची मंदी आली.

मी निवृत्त झालोच होतो, त्यामुळे त्या गोंधळावरची हलकी, लोकप्रिय पुस्तकं वाचायला वेळ होता.

आणि अशी पाश्‍चात्त्य अर्थशास्त्राची कमकुवत, कधीकधी बदमाश अंगं उघड करणारी पुस्तकं, वृत्तपट,

चित्रपट वगैरेंचा सौम्यसा ‘पाऊस’ गेलं दशकभर पडतोच आहे!

त्या सार्‍यातून जे चित्र दिसायला लागलं ते म्हणजे हा ‘बाजार’. भोवताली जे दिसतं ते, स्वतःचे अनुभव,

चित्रपटांमधली गाणी आणि कवनं, इतर मार्गांनी पीडितांनी साधलेली अभिव्यक्ती, अशा सार्‍यांचं हे मिश्रण आहे.

एक ढोबळ रचना, structure आहेही; पण मुळात हा गप्पा, किस्से-कहाण्या, ‘गीतों भरी कहानी’ वगैरे

अनौपचारिक पद्धतींनी माझं आकलन मांडायचा प्रयत्न आहे.

- नंदा खरे

बाजार – मुल्यहीन अर्थव्यवहारांच मुक्त चिंतन – नंदा खरे
Bazar – Mulyahin Arthawyawaharanchan Mukta Chintan – Nanda khare

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Nanda khare

  • Translator: Nanda Khare
  • No of Pages: 204
  • Date of Publication: 25 -1 -2022
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-91547-56-1
  • ISBN: 978-93-91547-56-1
  • Availability: 20
  • Rs.250.00
  • Rs.200.00