Sharir

New -20% Sharir

शरीर

‘वैद्यकशास्त्र हा अत्यंत कठीण समजला जाणारा विषय सर्वसामान्यांना समजण्यासाठी आपल्या बोलीभाषेत सांगणारं हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे.’ - डॉ. विठ्ठल लहाने, सुप्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन.

‘मानवी शरीर प्रणाली, त्याची रचना व कार्य हे अत्यंत जटिल आणि समजून घेण्यास कठीण आहे. यातून सर्वसामान्यांच्या मनातील असंख्य प्रश्नांचे निरसन होईल.’ - डॉ. अविनाश सुपे, डीन, केईएम हॉस्पिटल.

‘शरीर हे पुस्तक वाचणं म्हणजे शरीरविज्ञानाच्या क्षेत्रात मुशाफिरी घडवून आणणारा आणि मनाला उल्हासित करणाऱ्या तरल सिंफनीसारखाच अनुभव आहे.’ - डॉ. नंदकुमार, सुप्रसिद्ध हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ.

‘प्रत्येकानं ‘शरीर’ हे अद्‌भुतरम्य पुस्तक वाचणे आणि संग्रही ठेवणे अगत्याचे आहे, या पुस्तकामुळे आपल्याला आपल्यातल्या अणूरेणुला ओळखण्यासाठी मोलाची साथ लाभणार आहे.’ - डॉ अनिल गांधी, सुप्रसिद्ध सर्जन.

‘ग्रामिण भागातून मेडिकलचं शिक्षण घ्यायला येणाऱ्या आणि इतरही सगळ्याच विद्यार्थ्यांना शरीरक्रियाशास्त्र हा विषय समजण्यासाठी ‘शरीर’ हे पुस्तक खूपच मदत करेल असं मला वाटतं.’ - डॉ. अजित भागवत, सुप्रसिद्ध हृदयक्रियातज्ज्ञ

‘अत्युकृष्ठ! हे पुस्तक वाचताना आपण प्रत्येक अवयवसंस्थेच्या आत जाऊन प्रत्यक्ष अनुभवतोय असंच वाटत राहतं.’ - डॉ. विवेक नळगिरकर

‘जनांसाठी असलेलं हे ‘शरीर’ इतिहास आणि शरीर विज्ञान यांची गुंफण करून  आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. आपण स्वतःला नव्याने ओळखायला लागतो.’

- डॉ. शंतनू अभ्यंकर

‘कोणत्याही समाजातल्या नागरिकांचं वैद्यकाविषयी झालेलं लोकशिक्षण ही त्या देशातल्या लोकांच्या उत्तम आरोग्याची पहिली पायरी असते. त्या दृष्टीनं हे पुस्तक समाज प्रबोधक आहे.’ - डॉ. श्रीराम वसंत कुलकर्णी

‘सध्या वेगवेगळ्या दिशांनी येणाऱ्या माहितीमुळे सामान्य माणूस भांबावला नसेल तरच नवल. अशा परिस्थितीत मराठी वाचकांना आपल्या शरीराबद्दलचं ज्ञान देण्यात ‘शरीर’ यशस्वी होईल असा विश्वास वाटतो.’ - डॉ. मंजिरी करंदीकर

‘अ‍ॅनॅटॉमी आणि फिजिऑलॉजी या विषयांसहित डेंटिस्ट्री या माझ्या व्यवसायासंबंधी दोन प्रकरणं यात समाविष्ट असल्यामुळे हे मुळातच उत्कृष्ठ असं पुस्तक मला अधिक प्रिय वाटलं.’ - डॉ. वैशाली वडगांवकर, सुप्रसिद्ध डेंटिस्ट

‘या पुस्तकात शरीरशास्त्र या विषयाचा आतापर्यंतचा गेल्या काही हजार वर्षांचा रंजकपणे मांडलेला इतिहास वाचून विद्यार्थ्यांना या विषयात संशोधन करायला नक्कीच प्रेरणा मिळेल.’ - प्रो. डॉ. सुजाता कानेटकर

अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे


Sharir

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.425.00
  • Rs.341.00